मराठी कुटुंबाला मारहाण करणाऱ्या गुजराती ‘शहा’ला मनसेचा चोप

blank

टीम महाराष्ट्र देशा: ठाण्यातील नौपाडा भागामध्ये राहणाऱ्या मराठी कुटुंबाला मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. मारहाणीनंतर पाच दिवस उलटूनही पोलिसांनी दखल घेतली नाही, त्यामुळे आक्रमक झालेल्या मनसैनिकांनी हसमुख शहा या गुजराती पिता – पुत्रांना चोप दिला आहे.

लिफ्टचा दरवाजा चुकून अर्धवट उघडा राहिल्याच्या शुल्लक कारणामुळे पैठणकर या मराठी ब्राम्हण कुटुंबियांना हसमुख शहा व त्यांच्या पुत्राने पिता-पुत्राने खालच्या भाषेतील शिवीगाळ करून बेदम मारहाण केली होती. मारहाणीचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला होता, त्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून आक्रमक भूमिका घेण्यात आली होती.

या भागामध्ये मराठी कुटुंब मोठ्या प्रमाणात राहत असताना असताना देखील मराठी कुटुंबाला मारहाण होणं हे अत्यंत दुर्दैव असल्याचं, मनसे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी म्हंटले होते. पोलसांनी योग्य कारवाई न केल्यास स्वतः शहा पिता – पुत्रांना चोप देण्याचा इशारा त्यांनी दिला होता.