कॉंग्रेसच्या फेरीवाला मोर्चावर मनसेकडून बटाटे फेक

टीम महाराष्ट्र देशा – मुंबईतील फेरीवाल्यांच्या विरोधात मनसेनी फेरीवाले हटावो मोहीम सुरु केली आहे त्या मोहिमेला कॉंग्रेसने कडाडून विरोध केला. आज काँग्रेसच्या वतीनं फेरीवाल्यांच्या समर्थनासाठी फेरीवाला सन्मान मोर्चा काढला होता. त्या मोर्चाला मनसेचा विरोध होता. मुंबईत गेले काही दिवस सुरु असलेला फेरीवाल्यांचा विरोध थांबवण्यासाठी मुंबई काँग्रेसच्या वतीनं फेरीवाला सन्मान मोर्चा काढण्यात आला.

bagdure

हा मोर्चा दादर परिसरातील मुख्य रस्त्यांवरून फिरणार होता.याच मोर्चाचा मनसेने निषेध केला आहे. आणि मोर्च्यावर बटाटे फेकून मारले आहेत. पोलिसांनी या मोर्चाला परवानगी दिली होती. मोर्चा मूक स्वरूपात निघणार आहे. कुठलीही घोषणाबाजी आम्ही करणार नाही असं सुद्धा काँग्रेसच्या वतीनं सांगण्यात आलयं.याआधीही संजय निरूपम यांनी फेरीवाल्यांसाठी मोर्चा काढला होता. पण त्या मोर्चाला परवानगी नव्हती त्यामुळे निरूपम यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. फेरीवाल्यांच्या मुद्द्यावरून भरपूर राजकारणही करण्यात आलं होतं.

You might also like
Comments
Loading...