मुंबई : राज्यात दसरा मेळाव्या (Dussehra Melawa) वरुन (दसरा मेळावा) वातावरण तापलं आहे. शिवसेना (Shivsena) पक्षात एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) असे दोन गट पडल्यामुळे शिवतीर्थावर एक आणि बीकेसी मैदानावर एका, असे दोन दसरा मेळावे होणार आहे. त्यामुळे कोणाच्या दसरा मेळव्याला जास्त गर्दी होणार आहे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. याचपार्श्वभूमीवर मनसे नेते प्रकाश महाजन यांनी टीका केली आहे.
प्रकाश महाजन यांचा घणाघात :
यंदाच्या दसरा मेळाव्यात विचार ऐकायला मिळणार नसून एकमेकांचे वस्त्रहरण करणार असल्याचा घणाघात महाजनांनी केला आहे. सोनं लुटण्याऐवजी अंगावरच्या चिंध्या गोळा कराव्या लागतील, मेळावे यशस्वी होण्याऐवजी यामागे असणारी जी शक्ती आहे त्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. शिवतीर्थावरील मेळावा यशस्वी झाला नाही तर राष्ट्रवादी काँग्रेसची प्रतिष्ठा जाणार आहे. यशस्वी झाला तर राहिलेल्या
शिवसैनिकांचे मनोध्यैर्य वाढणार, त्याचसोबत बीकेसीतील मेळावा यशस्वी झाला नाही तर भाजपाची प्रतिष्ठा पणाला लागेल. त्यामुळे मेळावे यशस्वी करण्याची गरज संयोजक, आयोजकांपेक्षा इतरांना जास्त आहे, असं प्रकाश महाजन (Prakash Mahajan) म्हणाले.
बाळासाहेबांवर निष्ठा आहे हे दाखवण्यासाठी शिवसैनिक शिवतीर्थावर जमा होतील :
उद्धव ठाकरे- एकनाथ शिंदे यांच्या मागे असणाऱ्या शक्ती मुंबई कोणाच्या हातात जाणार यासाठी कामाला लागल्या आहेत. बाळासाहेबांवर निष्ठा आहे की नाही? बाळासाहेबांवर निष्ठा आहे हे दाखवण्यासाठी शिवसैनिक शिवतीर्थावर जमा होतील. मात्र शिंदे गटाचं उलटं आहे. सत्तेतून मिळणाऱ्या पैशाचा वापर करत बसेस भरून लोकं आणली जाणार असल्याचं महाजन म्हणाले.
दरम्यान, उद्या बीकेसीत गर्दी जमली नाही तर लोकं एकनाथ शिंदे यांच्यावर संशय घेतील. जे शिंदेंसोबत बाहेर पडलेत त्यांना हा मेळावा यशस्वी करण्यासाठी खूप प्रयत करावे लागतील, ज्यांच्या भरवशावर शिंदे बाहेर पडलेत त्यांच्या समोरही हा मेळावा यशस्वी करण्याचं मोठं आव्हन असल्याचं प्रकाश महाजन यांनी म्हटलं आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Sanjay Raut | संजय राऊतांचा दसरा तुरुंगातच होणार, न्यायालयीन कोठडीमध्ये वाढ!
- New Car Launch | Aston Martin ची ‘ही’ नवी कार बाजारात लाँच
- Shahaji Bapu Patil | “ठाकरेंचा दसरा मेळावा राष्ट्रवादीला आंदण”; शहाजीबापू पाटील यांची खोचक टीका
- Bike Update | बाईक प्रेमींसाठी ऑक्टोबर महिन्यात येत आहे ‘या’ नवीन टू व्हीलर
- Girish Mahajan | फडणवीसांच्या कानात सांगितल्याचा ‘तो’ दावा एकनाथ खडसेंनी नाकारताच गिरीश महाजनांनी दिलं आव्हान, म्हणाले…