fbpx

मनसेचे अनोखे आंदोलन, कात्रज कोंढवा रस्त्यावर खोदलेल्या खड्यात चालवली होडी

पुणे : कात्रज -कोंढवा रस्त्याचे काम संथ गतीने होत असल्याचा आरोप करत पुणे मनसेच्या वतीने अनोखे आंदोलन करण्यात आले. कात्रज -कोंढवा रस्त्यावर खोदण्यात आलेल्या खड्ड्यात होडी चालवून मनसेने आंदोलन केले आहे.

कात्रज -कोंढवा रस्त्याचे काम संथ गतीने सुरु असल्याचे वृत्त एका वृत्तवाहिनीने काही दिवसांपूर्वी दिले होते. कात्रज-कोंढवा रस्त्याच्या संपूर्ण भूसंपादन न करता सुरु केलेले काम ३६ महिन्यांच्या मुदतीत संपेल की नाही असा प्रश्न उपस्थित असा सवाल त्यामध्ये उपस्थित्त करण्यात आला होता.

दरम्यान मनसेने कात्रज -कोंढवा रस्त्याचे काम संथ गतीने चालत असल्याचे म्हणत कात्रज -कोंढवा रस्त्यावर खोदण्यात आलेल्या खड्ड्यात होडी चालवून आंदोलन केले. इतकेच नव्हे तर ४० हुन अधिक बळी घेणा़ऱ्या ८४ मीटर डीपी रस्त्यासाठी २०१२ सालापासुन अनेक राजकीय आंदोलने करण्यात आली. सुमारे ४ वेळा या रस्त्याची निविदा विविध कारणाने रद्द झाली. त्यामुळे राजकीय श्रेयवादात अडकलेल्या ३ किलोमीटरच्या रस्त्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यामध्ये लक्ष घालावे लागले, असे मनसेने म्हंटले.

इतकेच नव्हे तर तीन महामार्गांना जोडणारा हा रस्ता आता पुणे महानगरपालिकेचा पथदर्शी प्रकल्प म्हणुन या रस्त्याचे काम सुरु केले आहे. मात्र पालिका कर्मचारी जरी भूसंपादन झाले असल्याचे दावे करीत असले तरी चाललेल्या संथ गतीमुळे हे काम वेळेत पूर्ण होईल का यामध्ये शंका निर्माण होत आहे, असेही मनसेने म्हंटले आहे.

तसेच हे काम रखडण्यासाठी स्थानिक आमदार व प्रभाग क्रमांक ३८ व ४१ चे नगरसेवक जबाबदार असल्याचे म्हणत, पुढील काळात रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशाराही मनसेने दिला आहे.