बुलेट ट्रेन विरोधात मनसे आक्रमक! जागा मोजणीची मशीन दिली फेकून 

raj-thackeray

ठाणे: राज ठाकरे यांनी मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनविरोधात भूमिका घेतली आहे. यापूर्वी अनेक व्यासपीठावरून राज ठाकरे यांनी नरेंद्र मोदींवर हल्लाबोल केला होता. आता मनसेच्या कार्यकर्त्यांनी देखील आक्रमक भूमिका घेत शीळफाटा परिसरात बुलेट ट्रेनसाठी सुरू असलेली जागेची मोजणी मनसे कार्यकर्त्यांनी बंद पाडली आहे. जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव नेतृत्त्वाखाली कार्यकर्त्यांनी हे आंदोलन केलं. यावेळी मनसेच्या कार्यकर्त्यांनी मोजणीची मशीन फेकून दिली. पोलिसांचा बंदोबस्त झुगारुन हे आंदोलन करण्यात आलं.

पालघर येथील सभेत बोलतांना राज ठाकरे यांनी बुलेट ट्रेन विरोधात आक्रमक भूमिका घेतली होती. बुलेट ट्रेनसाठी जबरदस्तीने तुमची जमीन घेतली गेल्यास बुलेट ट्रेनचे रूळ उखडून फेका, असं यावेळी राज ठाकरे यांनी जाहीर सभेत सांगितले होते. बुलेट ट्रेन ही महाराष्ट्राच्या फायद्याची नाही, पण यात महाराष्ट्रातील लोकांची यात जमीन जात असल्याचं सांगितलं. एकंदरीत राज ठाकरे यांनी आजच्या सभेत सरकारवर चौफेर टीका केली आणि मोठ्या प्रमाणात चिमटे काढले.