fbpx

मनसेने दाखवला पुन्हा मोठेपणा; प्रभाग क्रमांक २२ ची पोटनिवडणूक लढवणार नाही

mns pune

पुणे: माजी महापौर चंचला कोद्रे यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले होते.चंचला कोद्रे या राष्ट्रवादी कॉंग्रेस कडून प्रभाग २२ मधून दुसऱ्यांदा निवडून आल्या होत्या. कोद्रे यांना श्रद्धांजली म्हणून मनसेने पोटनिवडणुक न लढवण्याचा निर्णय घेतला आहे.

मनसे गटनेते वसंत मोरे यांनी पोटनिवडणुकी संदर्भात राज ठाकरेंची भेट घेवून चर्चा केली होती. प्राभाग क्रमांक २२ ची निवडणूक मनसे लढवणार नाही. असं आज मनसेच्या वतीने जाहीर करण्यात आले. तसेच कोद्रे यांच्या घरातील उमेदवार असल्यास इतर पक्षांनीही निवडणूक लढवू नये. निवडणूक बिनविरोध व्हावी, असे स्पष्ट केले.

चंचला कोद्रे या राष्ट्रवादी कॉंग्रेस कडून प्रभाग २२ मधून दुसऱ्यांदा निवडून आल्या होत्या. पहिल्यांदाच निवडून आल्यानंतर राष्ट्रवादीकडून त्यांना महापौरपदाची संधी मिळाली होती. महिलांच्या संघटनात त्या कायम अग्रेसर होत्या.