भिंत आमची, भाजपची जाहिरात मनसैनिकांनी पुसली

मुंबई : शिवसेना-भाजपमधील श्रेयवादात आता मनसेनेही उडी घेतली आहे. शिवस्मारकाच्या भूमिपूजनाबाबत दादरच्या कोहिनूर टॉवरच्या भिंतीवर असलेली पंतप्रधान नरेंद्र मोदींची जाहिरात मनसैनिकांनी पुसली आहे. कोहिनूर टॉवरची भिंत पक्षाची असल्याचा दावा करत मनसेने भाजपची जाहिरात हटवली.

शिवसेना भवनासमोरच्या कोहिनूर टॉवरच्या भिंतीवर आधी मनसेची जाहिरात होती. मात्र ही जाहिरात पुसून भाजपने शिवस्मारकाच्या भूमिपूजनाबाबत मोदींची जाहिरात लावली. यामुळे आक्रमक झालेल्या मनसेने भाजपची जाहिरात पुसली.

छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्मारक म्हणजे भाजपची वचनपूर्ती असल्याचा दावा केला जात असताना आता शिवसेनेनेही पोस्टर लावले आहे. शिवस्मारक व्हावे ही शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांची इच्छा, असे पोस्टर्स  शिवसेनेने लावले  आहे.

You might also like
Comments
Loading...