दरोड्याचा गुन्हा दाखल झालेल्या मनसे पदाधिकाऱ्यांना अटक

परप्रांतीय फेरीवाल्यांविरोधात गुन्हा नोंद होत नाही तोपर्यंत जमीन घेणार नाही - मनसे शहराध्यक्ष

पुणे- सिंहगड रोड पोलीस स्टेशनमध्ये दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आलेले मनसे पदाधिकारी पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाले असून पोलिसांनी त्यांना त्याब्यात घेतलं आहे. दरम्यान कार्यकर्त्यांवर दाखल करण्यात आलेला दरोड्याचा गुन्हा परप्रांतीयांकडून आकसापोटी दाखल करण्यात आला असून जोपर्यंत त्या फेरीवाल्यांविरोधात आमची तक्रार दाखल केली जात नाही तोपर्यंत जामीन घेणार नसल्याचं मनसे शहराध्यक्ष अजय शिंदे यांनी सांगितलं आहे. तसेच मनसेच्या अनेक कार्यकर्त्यांनी सिंहगड रोड पोलीस स्टेशनसमोर ठिय्या मांडला आहे.

Rohan Deshmukh

काय आहे प्रकरण?
नरवीर तानाजी मालसुरे रस्तावर ( सिंहगड रोड) राजाराम पुलाजवळ काल मनसे कार्यकर्त्यांनी फेरीवाल्यांविरोधात आंदोलन केले होते. या आंदोलकांनी फेरीवाल्यांच्या सामानाची तोडफोड केली होती. आज अंदाजे ४० ते ५० आंदोलकां विरोधात सिंहगड रोड पोलीस स्टेशनमध्ये दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे . तसेच फर्ग्युसन महाविद्यालय रस्त्यावरील हल्ल्याप्रकरणी डेक्कन पोलीस स्टेशनमध्ये हाणामारीचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे .

Latur Advt
You might also like
Comments
Loading...