कोरोना काळात फक्त ‘हाथ की सफाई’, मनसेचा आरोप

कल्याण : कोरोनाच्या काळात जनतेच्या हिताची कामे न करता केवळ ‘हात की सफाई’ करण्याचे काम करण्यात आले आहे. नालेसफाईच्या बाबत दरवर्षी प्रमाणे या ही वर्षी बोंबच असल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने करण्यात आलाय. मनसे आमदार प्रमोद ऊर्फ राजू पाटील यांनी हा आरोप केलाय. कल्याण डोंबिवली महानगर पालिकेतील भ्रष्ट्राचारावर त्यांनी या निमित्त प्रश्नचिन्ह उपस्थित केलय. पावसामुळे कल्याण परिसरात साचलेल्या पाण्याबाबत त्यांनी ही टीका केलीय.

पावसाळ्यापूर्वी महानगर पालिकेच्या वतीने लाखो रुपयांची कामे केली जातात. पावसाळ्यात रस्त्यांवर पाणी साचू नये किंवा नागरिकांच्या घरात पाणी शिरू नये, त्यासाठी हा खर्च करण्यात येतो. यंदा तर लॉकडाऊन होते. त्यामुळे महानगर पालिकेला काम करण्यात सुविधा होती. तरी देखील कल्याण-डोंबिवली महानगर पालिकेने कोरोना काळात नाले सफाई करण्याऐवजी हात की सफाई केली असल्याचा आरोप आमदार पाटील यांनी केला आहे.

मुंबई आणि परिसरामध्ये हवामान विभागाच्या वतीने ९ ते १२ जून दरम्यान अतिवृष्टी होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. त्यानुसार मनपाच्या वतीने तत्काळ उपाय योजना म्हणून अनेक कामे करण्यात आली होती. मात्र, तरी देखील अनेक परिसरामध्ये पावसाचे पाणी साचल्याने मनपाच्या कामावर टीका करण्यात येत आहे.

महत्त्वाच्या बातम्या

IMP