चक्क दीपिकाच्या नावे निघालं मनरेगाच कार्ड 

deepika padukon

मुंबई : सुशांतसिंह राजपूत प्रकरणात ड्रग अँगलच्या तपासणीत एनसीबी सक्रिय होती. या चौकशीत अनेक सेलिब्रिटींची नावं अमली पदार्थांचं सेवन करणाऱ्यांमध्ये आली होती. तर दीपिकाचे देखील या प्रकरणात नाव समोर आले होते. पादुकोण सोबत सारा अली खान आणि श्रद्धा कपूर यांचे देखील नाव आले होते.

अमली पदार्थ सेवन प्रकरणानंतर दीपिका आणखी एका प्रकरणामध्ये सापडली आहे. बॉलिवूड स्टार दीपिका पदुकोन एक स्थलांतरित मजूर असून मध्यप्रदेशातील खरगोन जिल्ह्यात ती मनरेगाचे काम करते, असे सांगितले तर कोणीही ही बाब हसण्यावरच घेईल; पण तिच्या नावाचे मनरेगाचे बनावट कार्ड मात्र तसे दाखवीत आहे. दीपिकासह अशा दहा स्टार लोकांची नावे मनरेगाच्या यादीत आहेत.

अमली पदार्थ चौकशीनंतर दीपिका पुन्हा गोवा परतली. गेल्या गुरुवारी, ऑक्टोबरला दीपिका पादुकोणने जिथून सोडले होते तेथून शूटिंगला सुरुवात केली. रिपोर्ट्सनुसार, जेव्हा ती सेटवर परत आली तेव्हा ती चांगली भावनांमध्ये होती.

महत्वाच्या बातम्या-