गोपीचंद पडळकर यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून केली “ही” मागणी

सांगली:विधान परिषद आमदार आणि भाजप नेते गोपीचंद पडळकर यांनी नुकतेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले आहे.या पत्रात त्यांनी म्हटले आहे की ‘महोदय आपला देश हा विविधतेने नटलेला देश आहे.या देशातील अनेक राज्यांना सांस्कृतिक वारसा आहे.प्रत्येक राज्य आपला तो सांस्कृतिक वारसा आपापल्या परीने जपत असतं.

या अनेक कार्यक्रमांपैकी आपल्याकडे सुद्धा वाघ्या – मुरळी या कार्यक्रमाला मोठा वारसा आहे.त्याला राज्यात मोठा वारसा आहे.महाराष्ट्राचे लोकदैवत “श्री खंडोबा” याच्या आराधनेसाठी वाघ्या – मुरळी कार्यक्रमाचे आयोजन केले जाते.

करोनाजन्य परिस्थितीमुळे या कार्यक्रमाला मज्जाव केला जातोय.या कार्यक्रमाच्या सादरीकरणात अनेक पुरुषांसोबत महिला देखील असतात.हा कार्यक्रम सादर करणारे राज्यात जवळपास ५००० हजार कलावंत आहेत,त्यांच्यावर उपसमारीची वेळ येऊ नये म्हणून आपण गांभीर्य पूर्वक विचार करून हा कार्यक्रम सादर करायला परवानगी द्यावी ही विनंती.

भाजप नेते राम कदम यांनी देखीलt ‘रामलीला ‘ कार्यक्रम सुरु करायला परवानगी मागितली होती.त्यानंतर पडळकर यांनी ही मागणी केली आहे.

महत्वाच्या बातम्या-