मुंबई : महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकीचा निकाल (Maharashtra MLC Election Result) थोड्या वेळाने येईल. दुपारी 4 वाजता 285 आमदारांनी मतदान पूर्ण केले. सायंकाळी ५ वाजता मतमोजणीला सुरुवात होणार होती. मात्र काँग्रेसने निवडणूक आयोगाला मेल करून दोन आमदारांच्या मतांवर आक्षेप नोंदवला आणि ही मते रद्द करण्याची मागणी केली. काँग्रेसच्या तक्रारीवरून निवडणूक आयोगाने (Election Commission) बैठक सुरू केली. यानंतर राज्य निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी काँग्रेसची तक्रार फेटाळून लावली. दरम्यान, निकालाची मतमोजणी सरु झाली आहे. दरम्यान, रामराजे नाईक निंबाळकर (Ramraje Naik Nimbalkar) आणि भाजपच्या उमा खापरे यांच्या कोट्यातील दोन मतं बाद करण्यात आली आहेत. २८५ पैकी दोन मतं बाद करण्यात आली आहेत.
भाजप आमदार आशिष शेलार यांनी रामराजे नाईक निंबाळकर यांच्या कोट्यातील तिसऱ्या क्रमांकाच्या मतावर आक्षेप घेतला होता. मतं पत्रिकेवर पेनाच्या खानाखुना होत्या. असाच प्रकार उमा खापरे यांच्याबाबत देखील घडला. त्यामुळे भाजप आणि महाविकास आघाडीला मोठा झटका बसला.
विधान परिषदेच्या 10 जागांसाठी 11 उमेदवार रिंगणात आहेत. भाजपने 5 तर महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षांनी (शिवसेना-2, राष्ट्रवादी-2, काँग्रेस-2) मिळून 6 उमेदवार उभे केले आहेत. आकड्यांचा खेळ पाहता शिवसेनेचे दोन्ही उमेदवार सेफ झोनमध्ये आहेत.
एमआयएमने राष्ट्रवादीचे एकनाथ खडसे यांना एक मतं आणि काँग्रेसचे चंद्रकांत हंडोरे यांना एक मतं जाहीर करून राष्ट्रवादीचा रस्ता सुकर केला. काही अपक्ष आमदारांनी राष्ट्रवादीला मतदान केल्याचे आधीच जाहीर केले होते. त्यामुळे महाविकास आघाडीचे संकट केवळ काँग्रेसवरच आहे. त्यामुळे दहाव्या जागेसाठी काँग्रेसचे भाई जगताप आणि भाजपचे प्रसाद लाड यांच्यात लढत आहे.
महत्वाच्या बातम्या :
>>> आमच्या सोशल मीडिया फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा! फेसबुक & टेलिग्राम ग्रुप <<<
>>> आपल्या परिसरातील महत्त्वाच्या समस्यांना वाचा फोडून, तुमच्या बातमीने बदल घडवा. { बातमी पाठवा SUBMIT NEWS } <<<