महिलेस मारहाण केलीच नाही; हा तर विरोधकांचा बनाव – चेतन टिळेकर

chetan tilekar

टीम महाराष्ट्र देशा: हडपसरचे भाजप आमदार योगेश टिळेकर यांचा छोटा भाऊ चेतन टिळेकर यांच्यावर महिलेस मारहाण केल्याप्रकरणी फिर्याद दाखल करण्यात आली आहे. मात्र संबंधित महिलेस आपण मारहाण केली नसून आमदार योगेश टिळेकर यांच्या यांची बदनामी करण्यासाठीच असे षडयंत्र करण्यात आल्याचे स्पष्टीकरण चेतन टिळेकर यांनी दिले आहे.

काय आहे प्रकरण
अतुल गीते (राहणार. भिलेनाथ चौक) यांची आणि चेतन टिळेकर यांच्या गाडीवर असणारा चालक यांच्यात भांडणे झाली होती. ही भांडणे मिटवण्यासाठी टिळेकर यांनी अतुलला टिळेकरवाड्यात बोलवुन घेतले. दरम्यान, माझ्या चालकाला का भांडतो म्हणत चेतन यांनी अतुल गीतेस मारहाण केल्याचा आरोप गीते यांच्याकडून करण्यात आला आहे. तसेच यावेळी अतुल सोबत असणाऱ्या सीताबाई गीते यांना देखील मारहाण करण्यात आल्याची फिर्याद कोंढवा पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.

काय म्हणाले चेतन टिळेकर
आमदार योगेश टिळेकर आणि आमचे संपूर्ण कुटुंब मागील अनेक वर्षापासुन कोंढवा हडपसर भागातील जनतेसाठी काम करत आहोत. माझ्या गाडीवर असणारा चालक आणि अतुल गीते यांची भांडणे झाली होती. या विषयी बोलण्यासाठी मी त्यांना ऑफिसवर बोलावले . अतुल सोबत त्याचे आई – वडील दोघेही उपस्थित होते. अतुल कायम भांडणे करत असल्याने त्यांच्या वडिलांनी मला ‘तू अतुलच्या मोठ्या भावा सारखा आहेस, त्याला समजावून सांग असे करत जाऊ नकोस’ म्हणून सांगितले. मी अतुलला समजावले मात्र गीते कुटुंबीय ऑफिसमधून बाहेर पडल्यावर विरोधकांनी मला आणि आमदार योगेश टिळेकर यांना बदनाम करण्याच्या उद्देशाने सदर फिर्याद दाखल करायला लावली आहे.Loading…
Loading...