शिवसेनेचा ‘हा’ धडाकेबाज आमदार अडकला कोरोनाच्या विळख्यात,मंत्र्यांसह कार्यकर्त्यांची चिंता वाढली

shivsena

सिंधुदुर्ग: राज्यात दिवसेंदिवस कोरोनाचा हाहाकार वाढतच चालला आहे. रोज कोरोनाच्या रुग्णांची धक्कादायक आकडेवारी समोर येत. अनेक डॉक्टर, आरोग्यसेवा कर्मचारी, पोलीस ते राजकारण्यांपर्यंत अनेकांना कोरोनाची लागण झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शिवसेना आमदार वैभव नाईक यांनीदेखील कोरोनाची लागण झाली आहे.

गेल्या काही दिवसांपासून वैभव नाईक यांची प्रकृती बरी नव्हती. त्यांनी कोरोना टेस्ट केली असता त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. वैभव नाईक यांच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असल्याचं कळतं आहे. त्यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.

वैभव नाईक हे कुडाळ-मालवण मतदारसंघाचे आमदार आहेत. लॉकडाऊनच्या काळात नाईक यांनी जिल्ह्यात अनेक ठिकाणी दौरा केला होता. यावेळी त्यांना कोरोनाची लागण झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

वैभव नाईक हे दोन-तीन दिवसांपूर्वी उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या सोबत दौऱ्यासोबत होते. आमदार नाईक यांच्या सहवासात जिल्ह्यातील अनेक लोकं आणि शिवसेनेचे जिल्ह्यातील बहुसंख्य अनेक पदाधिकारी संपर्कात आलेले आहेत.

महत्वाच्या बातम्या-

दूध दर आंदोलन : मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना छावा संघटनेनं ठेवलं दुधात

विलगीकरणातील व्यक्तींना घरबसल्या मिळणार कोरोनाविषयी वैद्यकीय सल्ला !

गुजरात भाजपची जबादारी आता चंद्रकांत पाटलांच्या खांद्यावर…

पुण्यात कोरोनामुक्त पोलीस समुपदेशकाची भूमिका बजावणार : सहपोलीस आयुक्त रवींद्र शिसवे

पुणे : उपचार मिळण्यात प्रचंड अडचणी; ‘आप’चे मनपा आयुक्त कार्यालयाबाहेर ठिय्या आंदोलन