ग्रामविकासमंत्री मुंडे यांना मंत्रालयाच्या प्रवेशद्वारावर आमदार वडकुते यांनी रोखलं

मुंबई : धनगर आरक्षणप्रश्नी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रामराव वडकुते यांनी ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांना मंत्रालयाच्या मुख्य प्रवेशद्वारावर रोखलं. धनगर आरक्षण मिळेपर्यंत मी मंत्रालयात प्रवेश करणार नाही, अशी घोषणा पंकजा मुंडे यांनी नांदेड जिल्ह्यात केली होती. पण दुसऱ्याच दिवशी त्या मंत्रालयात गेल्यानंतर राष्ट्रवादीचे आमदार रामराव वडकुते यांनी त्यांना मंत्रालयात जाण्यापासून रोखलं.

यामुळे मंत्रालयाच्या आवारात कवेल गोंधळाच वातवरण होते.

आपण असं वक्तव्य केलंच नसल्याचं स्पष्टीकरण पंकजा यांनी दिलंय. ‘आम्ही पुन्हा सत्ता प्रस्थापित करणार आहोत पण त्या सत्तेत विराजमान होत असताना धनगर आरक्षण दिल्याशिवाय मंत्रालयात प्रवेश करू शकणार नाही’ या माझ्या वक्तव्यावर मी ठाम आहे. माझ्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला, असं पंकजा मुंडे यांनी म्हटल आहे.