राज्यातील आमदारांची ‘चांदी’ ; प्रवास भत्ता तिपटीने वाढला

टीम महाराष्ट्र देशा : एकीकडे दुध उत्पादक शेतकरी आपल्या दुधाला भाव मिळावा म्हणून गेल्या ५ दिवसांपासून आंदोलन करत आहेत. यासाठी चर्चेच्या अनेक फेऱ्या रंगल्या जात आहेत.मात्र दुसरीकडे राज्यातील आमदारांची चांदी झाली आहे. आमदारांचा प्रवास भत्ता प्रति किलोमीटर 6 रुपयांवरून 20 रुपये करण्यात आला आहे. नागपूरात सुरु असलेल्या आधिवेशानात हे सुधारणा विधायक एकमताने मंजूर करण्यात आले आहे.

पेट्रोल-डिझेलच्या दरात होणारी वाढ , जनतेच्या कामासाठी, अधिवेशन, बैठकांसाठी फिरावे लागते म्हणून आमदारांच्या प्रवास भत्त्यामध्ये वाढ करण्यात आली असल्याचे गिरीष बापट यांनी सांगितले.

महाराष्ट्रातील आमदारांचा पगार किती?

महागाई भत्ता 91,120 रुपये

दूरध्वनी खर्च 80, 00 रुपये

संगणक चालकाचा पगार 10, 000 रुपये

टपालासाठी 10, 000 रुपये

मूळ पगार 67, 000 रुपये