फोन येताच बापूंनी फिरवली यंत्रणा ; सोलापुरातील नागरिकांची बंगळूरमध्ये जेवणाची व्यवस्था

सोलापूर (प्रतिनिधी) : देशभरात कोरोनासारख्या रोगाबरोबर लढण्यासाठी आ. सुभाष देशमुख यांनी पुढाकार घेतला आहे. जेवढी शक्य तितकी मदत ते करताना दिसत आहेत. त्यांनी नुकतेच बंगळुरू येथे कार्यरत असलेल्या सोलापूरच्या १० जणांची १४  दिवस जेवणाची व्यवस्था केली आहे.

सोलापूरमधील श्रद्धा चौताली, अर्चना नलावडे, भाग्यश्री पाटील, ऐश्वर्या कुलकर्णी, निशा घुले, विनायक बारेंकल, उमेश हिरेपट, केदार कदाटे, जुगलकिशोर भंडारी, शांतेश वरनाळ हे युवक-युवती बंगळुरूमध्ये कामाला आहेत. कोरोनामुळे अचानक २१ दिवसांचा लॉकडाऊन जाहीर झाल्याने ही सर्व मुले तिकडेच अडकले आहेत. त्यांचे जेवणाचे हाल होत असल्याने त्यातील एकाने थेट माजी सहकारमंत्री तथा आ. सुभाष देशमुख यांना फोन केला आणि अडचण सांगितली.

त्यानंतर आ. देशमुख यांनी तातडीने बंगळुरू येथील भाजप कार्यालयाला फोन लावत आपल्या शहरातील काही मुले बंगळुरूमध्ये अडकली आहेत, त्यांना जेवणाची व इतर गरजेच्या वस्तूंची व्यवस्था करण्यास सांगितले. बंगळुरू येथील भाजप पदाधिकार्यांनीही तातडीने त्या मुलांशी संपर्क साधत त्यांना जेवण आणि इतर वस्तू पुरवल्या व उर्वरित १४ दिवसही त्यांना वेळेवर जेवण पोहचवले जाईल, असे सांगितले. केवळ एका फोनवर सर्व व्यवस्था केल्यामुळे त्या मुलांनी आ. देशमुख यांना फोन करून आभार मानले.

मदत करणे माझे कर्तव्यचः आ. देशमुख

बंगळुरूमधील काही मुलांचा मला फोन आला होता. त्यांच्या जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे. ही त्यांना मदत नसून मी माझे कर्तव्य पार पाडले आहे. कोणालाही कसलीही मदत पाहिजे असल्यास आपल्याशी संपर्क साधावा, असे आवाहन आ. सुभाष देशमुख यांनी म्हटले आहे.

हेही पहा –