दक्षिणमधील प्रलंबित प्रश्नांसंबंधी आ. सुभाष देशमुखांनी घेतली जिल्हाधिकाऱ्यांची भेट

सोलापूर : दक्षिण तालुक्यातील अनेक कामे प्रशासकीय स्तरावर प्रलंबित आहेत, त्याला सुरूवात करावी तसेच सोलापुरातील बलात्कारित पिडीतेला न्याय मिळावा, अत्याचार करणार्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी माजी सहकारमंत्री आ. सुभाष देशमुख यांनी जिल्हाधिकारी मिलींद शंभरकर यांच्याकडे केली आहे.

आ. देशमुख यांनी सोमवारी जिल्हाधिकार्यांची त्यांच्या कार्यालयात जाऊन भेट घेतली आणि विविध मागण्यांचे निवेदन सादर केले. यावेळी त्यांच्यासमवेत उपमहापौर राजेश काळे, भाजपाचे जिल्हा सरचिटणीस हणमंत कुलकर्णी, इरप्पा बिराजदार व भाजपाचे पदाधिकारी उपस्थित होते.

Loading...

यावेळी आ. देशमुख यांनी मंद्रुप एमआयडीसी येथील शेतकर्यांना भाव व्यवस्थित मिळावा, भूसंपादन प्रक्रिया सुरू करावी, मंद्रुप अप्पर कार्यालयातील पदे तत्काळ भरावीत, मंद्रुप पाणीपुरवठा योजनेचे कामलवकर पूर्ण करावे, भीमा-सीना नदीवर ब्रिज कमबंधारा बांधवा, यामध्ये तीन सर्कल समाविष्ट करावीत, पदवीधर मतदार नोंदणी करून घ्यावी, शिष्यवृत्तीचे वाटप करावे, तालुक्यातील अवैध वाळू उपास बंद करावा, ग्रामविकास विभागांतर्गत ३५ः१५ मंजूर निधीवरील स्थगिती उठवावी, होटगी येथील आदिवासी शाळेचे बांधकामसुरू करावे यासह विविध मागण्या केल्या.

हेही पहा –

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

कोरोनाला घालवण्यासाठी देशाला 21 नाही तर 49 दिवसांच्या लॉकडाऊनची गरज !
निलंग्यातील मज्जीदमधून १२ परप्रांतीय पोलिसांच्या ताब्यात !
‘या’ तारखेपासून रेल्वे तिकीट बुकिंगला होणार सुरुवात?
कनिका कपूरच्या तब्ब्येतीबाबत डॉक्टरांनी केला वेगळाच दावा
कोरोनामुळे उद्धव ठाकरे सरकारचे भवितव्य टांगणीला ; वाचा 'काय' आहे प्रकरण
धक्कादायक : निलंग्यातील मशीदमधून ताब्यात घेतलेल्या १२ परप्रांतीयांपैकी ८ जणांचा अहवाल पॉझीटीव्ह !
काय फरक पडतो म्हणणाऱ्या राज ठाकरेंनाच बसला कोरोनाचा फटका
सोन्याच्या दरात मोठी घसरण; जाणून घ्या आजचे दर
आज सांयकाळी आणि उद्या सकाळी दुध मिळणार नाही कारण.....
माझं शरीर आहे, माझी मर्जी मी माझ्या शरीरासोबत तेच करेन ! जे मला योग्य वाटतं