फसव्या महाआघाडी सरकार विरोधात एकत्र यावे : आ. सुभाष देशमुख

सोलापूर : राज्यात महाविकास आघाडीचे सरकार शेतकर्यांकडे आणि सामान्य जनतेकडे दुर्लक्ष करत आहे. ठाकरे सरकार नागरिकत्व सुधारणा कायदा आणि एनआरसीला विरोध करत आहे. याशिवाय दक्षिण तालुका मतदारसंघातील अनेक योजनांना स्थगिती दिली आहे, अनेक कामे प्रलंबित आहेत. त्यामुळे विकासाला खीळ बसत आहे. या निषेधार्थ येत्या २५ फेब्रुवारी रोजी मंद्रुप आणि दक्षिण तहसलीवर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. यात सर्वांनी सहभागी व्हावे, असे आवाहन माजी सहकारमंत्री तथा आ. सुभाष देशमुख यांनी केले.

दक्षिण तालुक्यातील प्रलंबित प्रश्न आणि २५ रोजी होणार्या धरणे आंदोलनाबाबत ग्रामस्थ आणि कार्यकर्त्यांना माहिती देण्यासाठी आ. देशमुख यांनी मंगळवारी संपूर्ण दिवसभर दक्षिण विधानसभा मतदारसंघाचा दौरा केला, त्यावेळी आ. देशमुख बोलत होते.

Loading...

जनतेने युतीला कल दिला होता. मात्र त्याला न जुमानता सेना- राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस एकत्र येत सरकार स्थापन केले आहे. त्यामुळे हे सरकार फसवे आहे. भाजपच्या प्रत्येक कामाला महाआघाडीचे सरकार स्थगिती देत आहे.अतिवृष्टी झाल्यावर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोरडवाहूला हेक्टरी २५००० तर बागायतीला हेक्टरी ५० हजार देण्याचे वचन दिले होते.

दुर्भाग्याने राज्यपालांनी दिलेले ८ हजार रूपये अनेकांच्या खात्यावर जमा झाले नाही. महाआघाडीने शेतककर्यांचा सातबारा कोरा करू असे सांगितले होते. मात्र तसे काही झाले नाही. दोन लाखांच्यावर ज्यांचे कर्ज आहे ते कर्जमाफीत बसत नाहीत. अशा अनेक गोष्टीत या सरकारने शेतकर्यांना फसवले आहे या निषेधार्थ २५ रोजी दक्षिण आणि मंद्रुप तहसीलवर आंदोलन करण्यात येणार असल्याचे आ. देशमुख यांनी सांगितले.

यावेळी देशमुख यांनी मनगोळी, हत्तूर, वांगी, कंदलगाव, अंत्रोळी, विंचूर, निंबर्गी, नांदणी, बरूर, औराद, मंद्रुप, भंडारकवठेसह अनेक गावांना भेट दिली. मान्यवरांच्या आणि भाजप पदाधिकार्यांच्या भेटी घेऊन त्यांना धरणे आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहन केले. यावेळी त्यांच्यासमवेत जिल्हा सरचिटणीस हणमंत कुलकर्णी, सभापती सोनाली कडते, अप्पासाहेब पाटील, यतीन शहा यांच्यासह संबंधित गावातील पदाधिकारी उपस्थित होते.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

कोरोनाला घालवण्यासाठी देशाला 21 नाही तर 49 दिवसांच्या लॉकडाऊनची गरज !
निलंग्यातील मज्जीदमधून १२ परप्रांतीय पोलिसांच्या ताब्यात !
‘या’ तारखेपासून रेल्वे तिकीट बुकिंगला होणार सुरुवात?
कनिका कपूरच्या तब्ब्येतीबाबत डॉक्टरांनी केला वेगळाच दावा
कोरोनामुळे उद्धव ठाकरे सरकारचे भवितव्य टांगणीला ; वाचा 'काय' आहे प्रकरण
धक्कादायक : निलंग्यातील मशीदमधून ताब्यात घेतलेल्या १२ परप्रांतीयांपैकी ८ जणांचा अहवाल पॉझीटीव्ह !
काय फरक पडतो म्हणणाऱ्या राज ठाकरेंनाच बसला कोरोनाचा फटका
सोन्याच्या दरात मोठी घसरण; जाणून घ्या आजचे दर
माझं शरीर आहे, माझी मर्जी मी माझ्या शरीरासोबत तेच करेन ! जे मला योग्य वाटतं
आज सांयकाळी आणि उद्या सकाळी दुध मिळणार नाही कारण.....