मुंबई : शिवसेना नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडामुळे राज्यातील सरकार अस्थिर झालं आहे. गेल्या दोन दिवसांपासून सुरु असलेल्या सत्तानाट्यावर काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी लाईव्ह येत भाष्य केलं आहे. ज्यांनी मी नको आहे, त्यांनी तसे येऊन सांगावे किंवा फोनवर बोलावे, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेच्या बंडखोर आमदारांना केले आहे. तसेच उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणार असल्याचे संकेत या लाइव्हमध्ये दिले आहेत.
यानंतर शिवासेना खासदार संजय राऊत यांनी या संदर्भात माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे. शिवसेना हा पक्ष स्वतंत्र आहे आणि विधिमंडळ पक्ष वेगळा आहे. मुख्यमंत्र्यांनी कोणतीही बैठक बोलवली नाही. फक्त आमदार भेटणार आहेत आणि त्यानंतर २ दोन आमदार शिंदे कडून आलेत त्यांची पत्रकार परिषद होणार आहे १२ नंतर शिवालय किंवा वर्षावर होईल अशी माहिती माध्यमांना त्यांनी यावेळी दिली.
अजूनही काही गेलेले आमदार आमच्या संपर्कात असल्याचा दावा संजय राऊत यांनी यावेळी केला. नितीन देशमुख आणि कैलास पाटील यांच्या पत्रकार परिषदेत संपूर्ण माहिती देतील असं संजय राऊत म्हणाले. या आमदारांनी पुन्हा निवडून याव असा इशारा संजय राऊत यांनी यावेळी बंडखोर आमदारांना दिला आहे.
दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मुख्यमंत्री पद सोडणार का? आणि नवीन मुख्यमंत्री कोण असणार? याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा रंगत आहे. दुसऱ्या बाजूला नितीन देशमुख आणि कैलास पाटील पत्रकार परीषदेत काय माहिती देणार याकडे सर्वांच लक्ष लागलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या :