उदयनराजेंचे निवडणुकीनंतरचं वागणं बदललं;शिवेंद्रराजेंची खंत

टीम महाराष्ट्र देशा : आम्ही आमदार म्हणून जो शब्द दिला तो आम्ही पाळला आहे. खासदार उदयनराजेंच निवडणुकीनंतरच वागणं बदललं आहे. ते माझ्या मतदार संघात कुरघोड्या करत आहेत. असा आरोप आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी केला आहे.

खासदार उदयनराजे आणि आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्यातील वाद जुना नाही. दरम्यान, लोकसभा निवडणुकीवेळी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मध्यस्थी करत दोघातील वाद मिटवला होता. परंतु लोकसभा निवडणूक होताच आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी खासदार उदयनराजेंच निवडणुकीनंतरच वागणं बदललं आहे असा आरोप केला आहे.

इतकेच नव्हे तर, आम्ही आमदार म्हणून जो शब्द दिला तो आम्ही पाळला आहे. त्यांनी जो शब्द दिला तो त्यांनी पाळावा. उदयनराजेंचं निवडणुकीनंतर वागणं बदललं आहे. त्यांच्या कुरघोड्या ह्या आम्हाला काही नवीन नाहीत. खासदारांच्या वागणुकीचा पाढा पक्षश्रेष्ठींकडे वाचला असून त्यावर त्यांनी निर्णय घ्यावा अशी मागणीही त्यांनी केली आहे.

याचबरोबर नाईक निंबाळकर आणि उदयनराजे या दोघांच्या वादात माझा संबध नाही, लोकसभेची निवडणूक झाल्यानंतर माझ्या मतदारसंघात त्यांच्या कुरघोड्या सुरु आहेत. याबाबत मी पक्षश्रेष्ठींना सांगितले जाते. वेळेच लक्ष घाला, माझे कार्यकर्ते अस्वस्थ आहेत. रामराजेंसोबत माझ कसलंही सेटिंग नाही, माझ सेटिंग साताऱ्यातील मतदारांशी, जनतेशी सेटिंग आहे, असेही त्यांनी म्हंटले.

तसेच, मी दबाव टाकून काम करणारा नाही आणि माझे राजकारणावर घर चालत नाही. त्यामुळे मी कोणाच्या दबावाखाली काम करणार नाही असेही त्यांनी म्हंटले.