व्यवसाय बंद ठेवून मरण्यापेक्षा जेलमध्ये बसलेलं बरं, शिवेंद्रराजे कडाडले

shivendra raje

मुंबई : राज्यासह देशात कोरोनाचा धोका पुन्हा एकदा वाढत चालला आहे. कोरोना रुग्णांचा वाढता आकडा लक्षात घेता चिंता व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात फक्त शनिवारी व रविवारी संपूर्ण लॉकडाऊन म्हणजेच वीकेंड लॉकडाऊन करण्यात आला असून सोमवारी रात्री आठ वाजल्यापासून कडक निर्बंध लागू करण्यात येणार आहेत. रात्री ८ ते सकाळी ७ पर्यंत रात्रीची संचारबंदी असेल. तर, दिवसभर जमावबंदी असेल. या निर्णयाला सर्वपक्षीय नेत्यांनी पाठींबा दिला आहे.

मात्र प्रशासनाने सोमवार ते शुक्रवारमध्ये केवळ अत्यावश्यक सेवांची दुकाने सुरु ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचा साताऱ्यात व्यापाऱ्यांनी कडाडून विरोध केला आहे. व्यापा-यांनी शहरात निदर्शने करुन दुकाने सुरु ठेवली आहेत. व्यापाऱ्यांच्या या असहकार आंदोलनाला आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी पाठींबा दिला आहे.

या व्यापा-यांचे म्हणणे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी ऐकले त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. जास्ती जास्त काय होणार 144 कलम याचा भंग होईल. गुन्हे दाखल होतील. धंदा बंद ठेवून, व्यवसाय बंद ठेवून मरण्यापेक्षा जेलमध्ये बसलेलं बरं अशी भावना व्यापा-यांची होईल. जिल्हा आणि राज्य शासनाने सोमवार ते शुक्रवार या कालावधीसाठीचा घेतलेल्या निर्णयाचा फेरविचार करावा असे आवाहन आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केले आहे.

महत्वाच्या बातम्या