fbpx

शरद पवारांना डावलत शिवेंद्रराजेंनी घेतली चंद्रकांत पाटलांची भेट ; साताऱ्यात चर्चांना उधाण

टीम महाराष्ट्र देशा :  जावळीचे राष्ट्रवादीचे आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांची भेट घेतली. शिवेंद्रराजे यांनी घेतलेल्या चंद्रकांत पाटलांच्या भेटीनंतर साताऱ्यात चर्चांना उधाण आलं आहे.

माण-खटावचे नेते अनिल देसाई यांच्या आईचं निधन झालं. देसाई यांच्या कु़टुंबियांना भेटायला महसूलमंत्री चंद्रकांत पाटील गेले होते. दरम्यान जावळीचे राष्ट्रवादीचे आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी चंद्रकांत पाटील यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान शिवेंद्रराजे यांनी मतदारसंघातल्या रस्त्याबाबतचे आणि जलयुक्त शिवाराच्या कामाचं निवेदन दिलं.

विशेष म्हणजे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार त्यावेळी साताऱ्यात होते. दरम्यान शरद पवार यांच्या भेटीला विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर तसेच बहुतांश आमदार गेले होते. परंतु शिवेंद्रराजे भोसले यांनी शरद पवारांची भेट न घेता महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांची भेट घेतली.

शरद पवारांना न भेटता शिवेंद्रराजेंनी चंद्रकांत पाटील यांची भेट घेतल्याने साताऱ्यात राजकीय वर्तुळात चर्चांना उधान आले आहे. परंतु आपण कुणावरही नाराज नसून बाहेर गावी असल्याने शरद पवारांना भेटायला जाऊ शकलो नसल्याचे शिवेंद्रराजे यांनी म्हंटले आहे.