माझ्या भावाची प्रकृती ठणठणीत, काळजी करण्याचे कारण नाही – उदयनराजे भोसले

मुंबई : भाजपाचे आमदार शिवेंद्रराजे भोसले यांची प्रकृती बुधवारी रात्री बिघडली होती. अचानक अस्वस्थ वाटू लागल्यानं त्यांना तातडीनं साताऱ्यातील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. रक्तदाबाचा त्रास वाढल्यानं त्यांची तब्येत बिघडली होती. नंतर त्यांना मुंबईच्या रुग्णालयात हलवण्यात आलं होतं.

आता भाजप नेते उदयनराजे भोसले यांनी शिवेंद्रराजेंच्या तब्येतीविषयी माहिती दिली आहे. याबद्दल उदयनराजे यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हतायेत, ‘आमचे बंधू आमदार छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची प्रकृती ठणठणीत आहे कार्यकर्ते व समर्थक यांनी काळजी करण्याचे कारण नाही. हॉस्पिटलमधून लवकरच डिस्चार्ज घेऊन ते आपल्या सर्वांच्या समोर येऊन संवाद साधतील,’ असे ते म्हणाले.

Loading...

तसेच विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवेंद्रराजेंच्या तब्येतीविषयी माहिती दिली आहे. याबद्दल फडणवीस आपल्या ट्विटरवर म्हतायेत, ‘छत्रपती शिवेंद्र राजे भोसले यांची आज मुंबईतील रुग्णालयात भेट घेतली. नेहमीप्रमाणेच त्यांनी हसतमुखपणे गप्पा मारल्या. त्यांच्या प्रकृतीत झपाट्याने सुधारणा झाल्याचे पाहून अतिशय समाधान वाटले.’

शिवेंद्रराजे भोसले यांची प्रकृती बिघडली; उपचारासाठी मुंबईला हलवलं

भाजपाचे आमदार शिवेंद्रराजे भोसले यांची प्रकृती बुधवारी रात्री बिघडली. अचानक अस्वस्थ वाटू लागल्यानं त्यांना तातडीनं साताऱ्यातील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. रक्तदाबाचा त्रास वाढल्यानं त्यांची तब्येत बिघडली. सध्या त्यांच्यावर उपचार करण्यात आले.

शिवेंद्रराजे त्यांच्या ‘सुरुची’ बंगल्यावर होते. रात्री उशिरा अचानक त्यांना अस्वस्थ वाटू लागलं. त्यामुळे त्यांच्या कुटुंबियांनी तातडीने साताऱ्यातील ‘प्रतिभा’ रुग्णालयात दाखल केलं. तिथे त्यांना रक्तदाबाचा त्रास होत असल्याचं निष्पन्न झालं.

शिवेंद्रराजे काल रात्री एका कार्यक्रमासाठी फलटणमध्ये गेले होते. तिथे जेवण झाल्यानंतर ते रात्री साताऱ्यातील ‘सुरुची’ बंगल्यावर पोहोचले. त्यावेळी त्यांना अस्वस्थ वाटू लागलं. त्यामुळे त्यांना तात्काळ रुग्णवाहिकेने साताऱ्यातील प्रतिभा रुग्णालयात दाखल करण्यात आलं. शिवेंद्रराजेंना रक्तदाबाचा त्रास होत असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं.

रात्री उशिरापर्यंत त्यांच्यावर उपचारानंतर, शिवेंद्रराजेंना बरं वाटू लागलं. मात्र सकाळी ते पुन्हा उपचारासाठी मुंबईच्या दिशेने रवाना झाले. मुंबईतील लीलावती रुग्णालयात शिवेंद्रराजेंवर उपचार होणार आहेत.त्यामुळे आता पुढील उपचारासाठी मुंबईला हलवण्यात आलं आहे.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

‘या’ तारखेपासून रेल्वे तिकीट बुकिंगला होणार सुरुवात?
कोरोनाला घालवण्यासाठी देशाला 21 नाही तर 49 दिवसांच्या लॉकडाऊनची गरज !
तब्लिगींमुळे चार दिवसांत कोरोनाचे रुग्ण दुप्पट, पवार म्हणतात ‘ते’ दाखवण्याची गरज आहे का ?
'१४ एप्रिलनंतर महानगरं आणि बाधित जिल्हे वगळून ग्रामीण भागातील लॉक डाऊन उठवावे'
आमदार साहेब गोरगरिबांच्या अन्नात माती कालवू नका, राष्ट्रवादी-शिवसेनेतील वाद आला चव्हाट्यावर
संतापजनक : तब्लिगींमुळे चार दिवसांत कोरोनाचे रुग्ण दुप्पट
मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना माझा सलाम ; या दिग्गज कलाकाराने केलं कौतुक
कनिका कपूरच्या तब्ब्येतीबाबत डॉक्टरांनी केला वेगळाच दावा
चीनने पाकिस्तानची केली क्रूर चेष्टा; N-95 मास्क ऐवजी चक्क अंडरवेअर पासून बनविलेले मास्क पाठवले
काय फरक पडतो म्हणणाऱ्या राज ठाकरेंनाच बसला कोरोनाचा फटका