भाजप आमदाराची मुलगी राष्ट्रवादीकडून निवडणूक लढविण्यास इच्छुक

टीम महाराष्ट्र देशा- नगर महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली आहे. या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवार निश्चित करण्यासाठी मुलाखती घ्यायला सुरुवात केली आहे. भाजपाचे आमदार शिवाजीराव कर्डिले यांची मुलगी ज्योती गाडे यांनी नगर महापालिका निवडणुकीसाठी प्रभाग क्रमांक 4 मधून राष्ट्रवादी काँग्रेसकडे उमेदवारी मागितली आहे.गाडे यांनी राष्ट्रवादीकडून उमेदवारी मागितल्याने नगरमधील राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे.

Rohan Deshmukh

गाडे या आधीपासूनच राष्ट्रवादीकडून तिकीट मिळविण्यासाठी प्रयत्नशील आहेत. गाडे यांना उमेदवारी देण्यासाठी राष्ट्रवादी देखील अनुकूल असल्याचं समजतंय.

Latur Advt
You might also like
Comments
Loading...