‘खोटी दाढी-मिशी लावून आम्हाला शिवाजी-संभाजी सांगायचं काम करु नका’

टीम महाराष्ट्र देशा : शिवसेनेतून राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणारे अमोल कोल्हे हे शिरुरमधून शिवसेनेचे खा.शिवाजीराव आढळराव पाटील यांच्याविरोधात लोकसभा लढणार आहेत.यानंतर आता शिवसेनेकडून कोळे यांना लक्ष्य केलं जाऊ लागलं आहे.

खोटी दाढी-मिशी लावून आम्हाला शिवाजी-संभाजी सांगायचं काम करु नका, असं म्हणत मनसेतून शिवसेनेत नुकताच प्रवेश केलेले शरद सोनावणे यांनी अमोल कोल्हे यांच्यावर तोफ डागली आहे. ते एका सभेत बोलत होते.शिरुरची चिंता करु नका, येथील सर्व जनता हुशार आहे, स्वाभिमानी आहे, असं ते यावेळी म्हणाले.

दरम्यान,काही दिवसांपूर्वी खा.आढळराव यांनी देखील कोल्हे यांच्यावर शेलक्या शब्दात टीका केली होती.येत्या निवडणुकीत शिरूर मतदार संघातून शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या विरुद्ध राष्ट्रवादीकडे खंबीर उमेदवार नसल्याने. राष्ट्रवादी कडून अमोल कोल्हे यांना ‘मराठा’ म्हणून नव्हे तर ‘माळी’ म्हणून शिरूरच्या निवडणुकीत उतरवले आहे, असं वक्तव्य आढळराव पाटील यांनी केलं होतं.

तर आता अमोल कोल्हे यांनी या वक्तव्याला उत्तर दिले आहे. माझी जात विचारू नका, मी छत्रपतींचा मावळा आहे, असा पलटवार अमोल कोल्हे यांनी आढळरावांवर केला होता..