वैद्यकीय क्षेत्रातील कर्मचाऱ्यांचे वेतन दुप्पट करा सतीश चव्हाण यांची अजितदादांकडे मागणी

ajit pawar

औरंगाबाद : देशभरासह आपल्य राज्यात देखील कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. राज्यात कोरोना ‘पॉझिटिव्ह’ रूग्णांची सं‘या दिवसें दिवस वाढत असल्याने आपल्या आरोग्य यंत्रणेवर ताण आला आहे. मात्र असे असताना देखील ते आपला जीव धोक्यात घालून प्रामाणिकपणे आपले कर्तव्य बजावत आहेत. त्यामुळे वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत असलेल्या कर्मचार्यांचे वेतन दुप्पट करावे अशी मागणी मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे निवेदनाव्दारे केली आहे.

उपमुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात आ.सतीश चव्हाण यांनी म्हटले आहे की, हरियाणा सरकारने कोरोना विरूध्द लढणार्या त्यांच्या राज्यातील वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत कर्मचार्यांचे वेतन दुप्पट करण्याचा निर्णय घेतला आहे. तर ओडिशा सरकारनं देखील त्यांच्या राज्यातील वैद्यकीय कर्मचार्यांना तीन महिन्यांचे वेतन आधीच देण्याचा निर्णय घेतला आहे. आपल्या राज्यातील देखील विविध शासकीय रूग्णालयांत काम करणारे डॉक्टर, कर्मचार्यांना अनेक आव्हानांचा सामना करावा लागत आहे. अनेक ठिकाणी डॉक्टर, कर्मचार्यांना ‘डबल ड्युटी’ करावी लागत आहे. खरे तर ते निभावत असलेले कर्तव्य हे कौतुकाच्या पलीकडचे आहे.

मागील अनेक दिवसांपासून यातील काही जण आपल्या आई-वडीलांना, मुला-बाळांना, पत्नीला प्रत्यक्ष भेटले सुध्दा नाहीत. घरी आपल्यानंतर अनेकांना स्वत:ला विलगीकरण करून घ्यावं लागत आहे. अशा परिस्थितीत देखील ते कोरोना विरूध्दची लढाई मोठ्या विश्वासाने लढत असल्याचे आ.सतीश चव्हाण यांनी म्हटले आहे.

त्यामुळे हरियाणा सरकारप्रमाणे आपण देखील राज्यातील वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत असणार्या कर्मचार्यांचे मनोधर्ये वाढविण्यासाठी त्यांचे वेतन दुप्पट करण्याचा निर्णय घ्यावा अशी मागणी आ.सतीश चव्हाण यांनी केली आहे.