सुप्रिया सुळे यांच्या हस्ते होणार आ.सतिश चव्हाण यांचा गौरव

sule supriya

औरंगाबाद : मराठवाडा पदवीधर मतदार संघातील नवनिर्वाचित आमदार सतीश चव्हाण यांचा सत्कार राष्ट्रवादी काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. आमदार सतीश चव्हाण गौरव समारंभ समितीच्या वतीने या सोहळ्याचं आयोजन करण्यात आले आहे. शनिवार, दिनांक 26 जानेवारी रोजी दुपारी साडेतीन वाजता महात्मा गांधी मिशनच्या रुक्मिणी सभागृहात हा कार्यक्रम पार पडेल.

यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर प्रमोद येवले, एमजीएम विद्यापीठाचे कुलपती अंकुशराव कदम, शिक्षक मतदार संघाचे आमदार विक्रम काळे, माजी महापौर नंदकुमार घोडेले यांची प्रमुख उपस्थिती असेल.

हा समारंभ म्हणजे केवळ गौरव समारंभ नसून यानिमित्ताने कायम विनाअनुदानित शाळांचा प्रश्न, शिक्षकेतर अनुदान, सामाजिक शास्त्रात पदांचा अनुशेष आणि शिक्षण क्षेत्रात औद्योगिक शिक्षणाला प्राधान्य आदी विषय मांडण्यात येणार आहे. या संबंधी पत्रकार परिषदेत माहिती देण्यात आली. यावेळी गौरव समारंभ समितीचे डॉक्टर राजेश करपे, फुलचंद सलामपुरे, डॉक्टर रामराव चव्हाण, प्राध्यापक बंडू सोमवंशी, प्राध्यापक भारत खैरनार, डॉक्टर गणी पटेल यांची उपस्थिती होती.

महत्वाच्या बातम्या