दादांचे वय पाहता त्यांनी राजकारणात सक्रीय होणे अपेक्षित नाही – सतेज पाटील

patil

कोल्हापूर: जेष्ठ कॉंग्रेस नेते माजी राज्यपाल डी वाय पाटील यांनी रविवारी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. पाटील यांच्या प्रवेशाने राजकीय वर्तुळात चर्चांना उधान आले आहे. आपल्याच मुलासाठी कट्टर विरोधक ठरणाऱ्या पक्षात प्रवेश केल्याने पुत्र सतेज पाटील देखील बुचकळ्यात पडले असणार हे नक्की आहे. मात्र, दादांचा राष्ट्रवादी प्रवेश हा आमच्यासाठी अनपेक्षित असून, त्यांच्या निर्णयाची आम्हाला कल्पना नव्हती. हा निर्णय होत असताना राष्ट्रवादीने आमच्या कुटुंबातील लोकांच्या कानावर हा विषय घालणे गरजेचं असताना तसे झाले नाही याचे वाईट वाटत असल्याची प्रतिक्रिया आ सतेज पाटील यांनी दिली आहे.

माजी राज्यपाल डॉ. डी. वाय. पाटील यांनी रविवारी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. राष्ट्रवादीचे प्रवक्ते अंकुश काकडे यांच्या उपस्थितीत डी. वाय. पाटील यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. पाटील यांच्या प्रवेशाने आघाडीतील सुप्त संघर्ष नव्याने उफाळून येणार असल्याचे दिसत.

Loading...

डॉ. डी. वाय. पाटील यांचे सुपुत्र आ. सतेज पाटील यांचे राजकारणातील कट्टर शत्रू मानले जाणारे धनंजय महाडिक हे राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार आहेत. त्यामुळे मुलाचा मुख्य विरोधक असणाऱ्या पक्षात डॉ. डी. वाय. पाटील यांनी प्रवेश केल्याने कोल्हापूरसह महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

दरम्यान, राजकारणापलीकडे जाऊन दादांनी अनेक लोकांशी सलोख्याचे संबंध ठेवले आहेत. वयाच्या 84 व्या वर्षी त्यांच्या वयाचा व तब्येतीचा विचार करता त्यांनी सक्रिय राजकारणात सहभागी व्हावे, हे अपेक्षित नाही. कुटुंब म्हणून आमच्या सर्वांसाठी हा निर्णय आश्‍चर्यकारक आहे. काँग्रेस पक्ष वाढीसाठी मी आजपर्यंत जोमाने काम केले आहे. भविष्यातही मी तितक्याच जोमाने कार्यरत राहणार असल्याच निवेदन सतेज पाटील यांनी केले आहे.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

...त्यामुळे मी मोठ्या मनाने माफी मागते - तृप्ती देसाई
मनसेच्या रणरागिणीचं तृप्ती देसाईंना खुले आव्हान, तू येच...
तर पवारांची औलद सांगणार नाही, अजित पवारांची भीष्मप्रतिज्ञा
घ्या आता ! इंदुरीकर म्हणाले, मी असं बोललोच नाही
यापुढे मी इंदुरीकरांना महाराज म्हणणार नाही - तृप्ती देसाई
इंदुरीकर महाराज समर्थकांकडून तृप्ती देसाईंचे होणारे चारित्र्यहनन महिला प्रतिनिधींना दिसत नाही का?
ही सदिच्छा भेट आहे. बाकी तपशिलात खोल शिरण्याची गरज नाही - खा. संजय राऊत
दणका राज ठाकरेंचा ! औरंगाबादमध्ये 'मनसे गद्दाराची' केली 'हकालपट्टी'
झोपड्यांना हात लावाल तर याद राखा - केंद्रियमंत्री रामदास आठवले यांचा सरकारला इशारा
भाजप नेत्यानेच उपस्थित केला सवाल, उदयनराजेंचे भाजपसाठी योगदान काय?