Sanjay Gaikwad | बुलढाणा : आधीच राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी वीर सावरकर (Veer Savarkar) यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यावरुन राज्यात खळबळ वाद निर्माण झाला आहे. हिंदुत्ववादी संघटना, भाजप आणि शिंदे गट आक्रमक झाला आहे. या पार्श्वभूमीवर शिंदे गटातील आमदार संजय गायकवाड (Sanjay Gaikwad) यांनी देखील नेहरुंबाबत विवादास्पद वक्तव्य केले होते. यावर काँग्रेस आमदार यशोमती ठाकूर (Congress MLA Yashomati Thakur) यांनी त्यांचा चांगलाच समाचार घेतला आहे. दरम्यान संजय गायकवाड यांनी पलटावर केला आहे.
संजय गायकवाड (Sanjay Gaikwad) म्हणाले, “मी काल नेहरुजींबाबत वक्तव्य केले. त्यामुळे यशोमती ठाकूर (Yashomati Thakur) यांनी मला गद्दार म्हटले तसेच मला इतिहासाचा अभ्यास नसल्याचे सांगितले. मात्र आम्ही गद्दारी नाही तर उठाव केला आहे. तुम्ही आम्हाला गद्दार म्हणण्याचा संबंध नाही कारण तुमचा आमचा पक्षाशी संबंध नाही. पण तुम्हाला अनपेक्षित मिळालेली सत्ता आमच्या ५० आमदरांमुळे तुमच्या हातातून गेल्यामुळे कदाचित तुम्ही चवताळल्यासारखे, पिसाळल्यासारखे वागत असाल. पण मी माझ्या मतावर ठाम आहे.”
काय म्हणाल्या होत्या यशोमती ठाकूर –
देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहेरू यांना त्यांच्या वाढदिवशीच लक्ष्य करत आमदार संजय गायकवाड यांनी बोचरी टीका केली होती. यावर आमदार यशोमती ठाकूर यांनी टीका करत संजय गायकवाड यांची अक्कल काढली होती. इतिहास माहिती नाही त्यांनी इतिहासाचे वाचन करावं टीका करण्यासाठी ही अक्कल लागते. या गद्दारांनी आपल्या बापाच्या पाठीत खंजीर खुपसला त्यांना काय निष्ठा काही माहिती असेल, असे यशोमती ठाकूर म्हणाल्या होत्या.
महत्वाच्या बातम्या :
- India Lockdown | कोरोना काळातील लोकांची व्यथा मांडणारा ‘इंडिया लॉकडाऊन’ चित्रपटाचा ट्रेलर रिलीज
- Raj Thackeray | राहुल गांधींचे सावरकरांबाबत वक्तव्य, मनसे आक्रमक! काळे झेंडे दाखवण्याचे राज ठाकरेंचे आदेश
- Eknath Shinde | राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत विविध महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या काय आहेत निर्णय
- Hatchback Car | छोट्या जागेमध्ये देखील सहज बसू शकतात ‘या’ हॅचबॅक कार
- Rahul Gandhi | “भारत जोडो यात्रा रोखूनच दाखवा”, राहुल गांधींचं खुलं आव्हान