अहमदनगर दुहेरी हत्याकांड : आमदार संग्राम जगताप यांना १२ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी

टीम महाराष्ट्र देशा : शिवसेनेचे अहमदनगर उपशहरप्रमुख संजय कोतकर व कार्यकर्ता वसंत ठुबे या दोघांच्या हत्येप्रकरणी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांच्यासह चौघांना १२ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

दरम्यान, रात्री पोलीस अधीक्षक कार्यालयात तोडफोड केल्याप्रकरणी २२ जणांना अटक करण्यात आली आहे. केडगाव पोटनिवडणूक निकालानंतर शनिवारी सायंकाळी शिवसेना पदाधिकारी संजय कोतकर व वसंत ठुबे यांची गोळ्या झाडून व कोयत्याने वार करून हत्या करण्यात आली. याप्रकरणी आमदार संग्राम जगतापसह चौघांना अटक करण्यात आली होती.

You might also like
Comments
Loading...