Rohit Pawar | मुंबई : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना आज जामीन मिळाला आहे. पत्राचाळ घोटाळा प्रकरणी मुंबई सत्र न्यायालयाच्या विशेष पीएमएलए न्यायालयाने हा जामीन मंजूर केला. खासदार संजय राऊत यांना दोन लाखांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर जामीन मिळाला. अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) जामीनाच्या निर्णयाला स्थगिती देण्याची मागणी केली. न्यायालयाने ईडीची ही मागणी फेटाळून लावली. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
रोहित पवार म्हणाले, “आज न्यायालयाने संजय राऊत यांना जामीन मंजूर केला. सत्यमेव जयते, मांडलेला मुद्दा खरा असले तर न्यायालय योग्य निर्णय देते. आज तो निर्णय संजय राऊत यांच्या बाजूने न्यायालयाने दिला आहे. संजय राऊत यांनी कुठलीही भूमिका परखडपणे मांडली आहे. ईडी सीबीआयने कारवाई केल्यानंतर, तसेच जेलमध्ये गेल्यावर देखील त्यांची परखड भूमिका होती.”
यादरम्यान राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांचे एक ट्विट ठाकरे गटातील नेते आणि कार्यकर्त्यांमध्ये चांगलेच व्हायरल होत आहे. रोहित पवार यांनी वाघाचा व्हिडिओ ट्विट केला आहे. संजय राऊत हा असाच एक वाघ आहे. ते जुलूमशाहीपुढे झुकले नाहीत, ते लढले. शेवटी सत्याचाच विजय झाला. वाघ पिंजऱ्यातून बाहेर आला आहे, असे संकेत रोहित पवार यांनी दिला आहे.
#सत्यमेवजयते!@rautsanjay61@ShivSena@ShivsenaComms pic.twitter.com/MBnD5gnWsl
— Rohit Pawar (@RRPSpeaks) November 9, 2022
संजय राऊत यांच्या जामीनाचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातील नेते आणि कार्यकर्त्यांनीच नव्हे तर राष्ट्रवादी काँग्रेसनेही मनापासून स्वागत केले आहे. आता राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांनाही जामीन मिळण्याची शक्यता असल्याचं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Supriya Sule | “सत्यमेव जयते” ; संजय राऊत यांना जामीनानंतर सुप्रिया सुळे यांची प्रतिक्रिया
- Dipali Sayyed | रश्मी ठाकरेंना ‘खोके’ येणं बंद झाल्याची खंत ; दिपाली सय्यद यांचा घणाघात
- Aditya Thackeray | शिंदे गट बैलांनाही नोटीस पाठवणार का – आदित्य ठाकरे
- Sanjay Raut | मोठी बातमी! राऊतांच्या जामीन स्थगितीची ईडीची मागणी न्यायालयाने फेटाळली
- Bhaskar Jadhav | संजय राऊत अपमानाचा बदला घेण्यासाठी मोठी झेप घेतील – भास्कर जाधव