Share

Ravi Rana | “शिंदे साहेब गरज पडल्यास…”, एकनाथ शिंदेंना आमदार रवी राणांची ऑफर

मुंबई : केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना (Shivsena) पक्षाचे ‘धनुष्यबाण’ हे चिन्ह गोठवले आहे. निवडणूक आयोगाच्या (Election Commision) या निर्णयामुळे राज्यातील राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. त्याचबरोबर पोट निवडणुकीमध्ये निवडणूक आयोगाने शिवसेना पक्षाचे ‘धनुष्यबाण’ हे चिन्ह कोणालाच वापरता येणार नाहीय. एवढंच नाही तर कोणत्याच गटाला शिवसेना पक्षाचं नावही लावता येणार नसल्याचं आयोगाकडून सांगण्यात आलं आहे. अशातच आमदार रवी राणा यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ऑफर दिली आहे.

रवी राणा यांची एकनाथ शिंदे यांना ऑफर –

चिन्ह गोठल्यामुळे उद्धव ठाकरे तसेच एकनाथ शिंदे यांच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे. अशातच आदरणीय शिंदे साहेब आपणास गरज पडल्यास माझ्या पक्षाचे चिन्ह असलेला पान्हा घेऊन मी तुमच्यासोबत उभं राहिन. आपण स्वाभीमान पार्टी आणि पाना हे चिन्ह घ्यावं, अशी ऑफर रवी राणा यांनी एकनाथ शिंदेंना दिली आहे.

दरम्यान, दुसरीकडे उद्धव ठाकरे यांनी आपल्या गटाला ‘शिवसेना बाळासाहेब ठाकरे’ असं नाव देण्याची परवानगी मिळावी, अशी मागणी निवडणूक आयोगाकडे केली आहे. ठाकरेंच्या या नावाला आता परवानगी मिळाणार का याकडे पाहणं महत्वाचं राहिल.

महत्वाच्या बातम्या :

मुंबई : केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना (Shivsena) पक्षाचे ‘धनुष्यबाण’ हे चिन्ह गोठवले आहे. निवडणूक आयोगाच्या (Election Commision) या निर्णयामुळे राज्यातील …

पुढे वाचा

Maharashtra Marathi News Mumbai Politics

Join WhatsApp

Join Now