मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामुळेच शिवसेना सत्तेत : रवी राणा

Uddhav-Thackeray-Devendra

टीम महाराष्ट्र देशा- महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री बदलाचे वारे वाहत अस्ल्याचा दावा शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी काल करून एकच खळबळ उडवून दिली होती. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामुळेच शिवसेना सत्तेत असल्याचा दावा अपक्ष आमदार रवी राणा यांनी केला आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बदलले तर अपक्ष आमदार सरकारसोबत राहणार नसल्याचा राणा यांनी इशारा दिला आहे.

मी तर राजीनामा देणार नाहीच, पण खोटे आरोप करणाऱ्या विरोधी पक्षनेत्यांनी राजीनामा द्यावा – मुख्यमंत्री

महाराष्ट्रात एकूण सात अपक्ष आमदार आहेत. त्यापैकी अचलपूर विधानसभाचे अपक्ष आमदार बच्चू कडू वगळता इतर सहा आमदार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पाठीशी उभे आहेत. यामध्ये रवी राणा, गणपत गायकवाड, किशनराव जाधव पाटील आणि शिरीष चौधरी यांचा समावेश आहे. या गटाचे नेतृत्व रवी राणा करत आहेत.

मराठा आरक्षण : रामदास आठवलेंनी सुचवला तोडगा

राणा यांनी माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कामाची स्तुती केली. मराठा आरक्षण देण्यास मुख्यमंत्री सक्षम आहेत. जर पाठिंबा काढला तर मुख्यमंत्र्याच्या पाठीशी आम्ही ठाम उभ आहोत. जनतेची कामे कशी करायची ही त्यांना चांगले माहित आहेत आतापर्यंत त्यांनी जनतेची कामे केली आहेत. यापुढेही करत राहणार. आहे. मराठा समाजाला आरक्षण देण्यास देवेंद्र फडणवीस सक्षम असल्याचाही दावा यावेळी राणा यांनी केला.

मुख्यमंत्र्यांची ‘वर्षा’वर सपत्नीक पूजा