fbpx

भाजप आमदार राम कदम यांचा आणखी एक वादग्रस्त व्हिडीओ व्हायरल

मुंबई : महिलांचा अवमान केल्यामुळे टीकेचे धनी बनलेले भाजपा आमदार राम कदम आणखी एका नव्या वादात सापडण्याची शक्यता आहे. कदम यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला असून या व्हिडीओत त्यांनी १८ वर्षावरील युवकांना त्यांचे नाव मतदार यादीत नोंदवण्याचं आवाहन केलंय. महागड्या आणि आलिशान गाड्यांमध्ये फिरायचं असेल, तिरूपतीला दर्शनासाठी जायचं असेल किंवा मग हिंदी चित्रपटसृष्टीच्या कलाकारांसह फोटो काढायचे असल्यास मतदार यादीत नाव नोंदवा, असं आवाहन कदम यांनी केलंय.

याशिवाय मतदार यादीत नाव नोंदवल्यास सिनेमाचं चित्रीकरण पाहाणं आणि कार चालवणं शिकवण्याची ग्वाहीसुद्धा त्यांनी या व्हिडीओद्वारे दिलीय. तरूणांना प्रोत्साहन देण्यासाठी हे करत असल्याचे कदम यांनी या व्हिडीओत सांगितलंय. कदम यांच्या या आवाहनावर सोशल मिडीयावर टीका होऊ लागली आहे.  राम कदम यांच्या या व्हीडीओवर आमदार जितेंद्र आव्हांड यांनी आक्षेप घेतलाय. राम कदम हे मतदार होण्यासाठी तरुणांना आमिष दाखवत असल्याचे त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय.

“….नकार असला तरी मुलीला पळवून आणण्यास मदत करेल”- राम कदम

तुमचे आमदार मुली पळवून आणण्याची भाषा करतात, हे तुमच्या कोणत्या शिस्तीत बसते? – सुप्रिया सुळे

राम कदमांना आली उपरती; ट्वीट करून मागितली माफी

2 Comments

Click here to post a comment