उस्मानाबाद जिल्हा परिषदेतील अध्यक्षपदाच्या चाव्या माजी आमदार राहुल मोटेंच्या हाती

blank

टीम महाराष्ट्र देशा :  माजी आमदार राहुल मोटे यांच्या गटाकडे असलेले सहा सदस्य निर्णायक आहेत. दरम्यान, राहुल मोटे हे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मर्जीतील असल्याने त्यांच्या आदेशावरून निर्णय होईल, असे बोलले जात आहे. जिल्हा परिषदेतील सत्तेच्या चाव्या बारामतीवरून फिरणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद अनुसूचित जातीच्या महिला प्रवर्गासाठी निश्चित झाले आहे. जिल्ह्यात महाशिवआघाडी की भाजप याची चर्चा होत आहे. राष्ट्रवादीचे माजी आमदार मोटे हे अजित पवार यांच्या मर्जीतील असल्याने बारामतीकर कोणाच्या पारड्यात माप टाकतात त्यांच्याकडे अध्यक्षपद जाणार आहे. जिल्हा परिषदेत 55 सदस्य आहेत. यामध्ये राष्ट्रवादीकडे 26, कॉंग्रेस 13, शिवसेना 11, भाजप 4 तर भारतीय परिवर्तन सेना एक असे संख्याबळ होते.

नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या. आमदार राणा रणजीतसिंह पाटील यांनी राष्ट्रवादीतून भाजपमध्ये प्रवेश केल्याने भाजपचे बळ 17 अधिक चार असे झाले आहे. शिवाय शिवसेनेचे दोन सदस्य अडीच वर्षांपूर्वीच आमदार पाटील गटाकडे आले होते. सेनेच्या छाया कांबळे यांनी नुकतीच सेनेशी फारकत घेतल्याने तेही आमदार पाटील गटाकडे येऊ शकतात. परिणामी पाटील गटाचे संख्याबळ 24 वर पोचते. तर नुकतेच कैलास पाटील हे आमदार म्हणून निवडून आले आहेत. त्यामुळे महाशिवआघाडीचे संख्याबळ 29 राहते.

मोटे गटाच्या सदस्यांनी आमदार पाटील गटासोबत जाण्याचा निर्णय घेतला तर त्यांचे संख्याबळ 30 वर जाऊ शकते. तर मोटे यांचा गट महाशिवआघाडीसोबत गेला तर संख्याबळ 29 वर जाते. त्यामुळे जिल्हा परिषदेतील अध्यक्षपदाची चावी मोटे यांच्याकडे असून, याची सूत्रे बारामतीवरून फिरतील, अशी चर्चा आहे.

महत्वाच्या बातम्या