fbpx

सैनिकांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या परिचारक यांना विधान परिषदेत येण्यास परवानगी

टीम महाराष्ट्र देशा :  भारतीय जवानाच्या पत्नीबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या आमदार प्रशांत परिचारक यांना विधान परिषदेत येण्यास परवानगी दिली आहे. आक्षेपार्ह वक्तव्यानंतर प्रशांत परिचारक यांचे निलंबन केले होते. परिचारक यांच्या विधान परिषदेतिल प्रवेशाच्या निर्णयावर कॉंग्रेसने जोरदार विरोध केला आहे.

पंजाबमधील सैनिक एकदाही घरी न येता वर्षभर सिमेवर लढत असतो. आणि त्याला फोन येतो तुला मुलगा झाला. त्या आनंदात तो पेढे वाटतो, असे बेताल वक्तव्य आमदार प्रशांत परिचारक यांनी निवडणूक प्रचार सभेत केले होते. त्यावेळी परिचारिक यांचे विधानपरिषदेतून दीड वर्षांसाठी निलंबित करण्यात आले होते.

याचदरम्यान, सरकारने आमदार प्रशांत परिचारक यांना विधान परिषदेत येण्यास परवानगी दिली आहे. परंतु सरकारच्या या निर्णयाला कॉंग्रेसने जोरदार विरोध केला आहे. इतकेच नव्हे तर, सैनिकांच्या पत्निचा घोर अपमान करणाऱ्या प्रशांत परिचारक यांचा निलंबनाला कॉंग्रेस पक्षाचा नेहमी विरोधा राहील असे कॉंग्रेस आमदार शरद रणपीसे म्हणाले आहेत.