fbpx

शिवाजी महाराजांच्या वेशातील राष्ट्रवादीच्या आमदाराने केला नेत्याला मुजरा !

टीम महाराष्ट्र देशा : राज्यातील विविध प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्रकाश गजभिये आज विधिमंडळात छत्रपती शिवाजी महाराजांची वेशभूषा करून आले होते. एकीकडे विधानसभेत आरक्षणावरून वातावरण तापले असताना प्रकाश गजभिये यांची वेषभूषा सर्वांचे लक्ष वेधून घेणारी ठरली होती. मात्र लक्ष वेधून घेत असताना गजभिये यांच्या हातून प्रचंड मोठी चूक घडली आहे.

प्रकाश गजभिये छत्रपती शिवाजी महाराजांची वेशभूषा करून विधिमंडळाच्या आवारात प्रवेश केला. त्या दरम्यान प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना गजभिये यांनी राज्य सरकारला अनेक प्रश्नही विचारले. मात्र विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांचे विधिमंडळ परिसरात आगमन होताच आमदार महोदयांना आपण शिवरायांच्या वेशात आहोत, याचे भान राहिले नाही. त्यांनी त्याच वेशामध्ये रामराजे नाईक-निंबाळकरांना मुजरा केला. रामराजे नाईक-निंबाळकरही त्यांना अभिवादन करत पुढे निघून गेले.

विश्ववंद्य छत्रपती शिवाजी महाराजांसमोर अवघे जग नतमस्तक होते परंतु स्टंटबाजी करण्याच्या नादात गुंतलेल्या आमदार महाशयांना याचा पुरता विसर पडला होता असच दिसत आहे. यासबंधित वृत्त ‘लोकमत’ने दिले आहे. गजभिये यांच्या या लाजिरवाण्या कृत्याने समस्त शिवप्रेमी जनतेमध्ये प्रचंड संतापाची लाट उसळण्याची शक्यता आहे.

(छायाचित्र – सुशील कदम – लोकमत )

(छायाचित्र – सुशील कदम – लोकमत )