fbpx

शहापूर तंटामुक्त आणि भगवायुक्त करण्यासाठी शिवसेनेत आलो – पांडुरंग बरोरा

टीम महाराष्ट्र देशा : राष्ट्रवादीला रामराम ठोकत हातात शिवबंधन बंधाणारे राष्ट्रवादीचे शहापूरचे आमदार पांडुरंग बरोरा यांनी त्यांच्या पक्षप्रवेशावर भाष्य केले. शहापूरची पाणीटंचाई दूर करण्यासाठी मी शिवसेनेत प्रवेश केला आहे, असे बरोरा यांनी म्हंटले.

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरच राष्ट्रवादी कॉंग्रेसला सेनेने धोबीपछाड दिला आहे. राष्ट्रवादीचे शहापूरचे आमदार पांडुरंग बरोरा यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा देत शिवसेनेत प्रवेश केला आहे. बरोरा यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत सेनेत प्रवेश केला.

त्यावेळी बरोरा यांनी आपल्या पक्षप्रवेशावर भाष्य केले. शहापूरची पाणी टंचाई दूर करणे हा माझा मुख्य उद्देश आहे, शहापूरची पाणीटंचाई दूर करण्यासाठी मी शिवसेनेत प्रवेश केला आहे. असे बरोरा यांनी म्हंटले.

इतकेच नव्हे तर एमआयडीसीचा विस्तार होण्यासाठी, तसेच रोजगार निर्माण होण्यासाठी मी सेनेत आलो आहे. याचबरोबर शहापूर हे तंटामुक्त आणि भगवायुक्त करण्यासाठी शिवसेनेत आलो, असेही बरोरा यांनी म्हंटले. तसेच आदिवासी भागाचे प्रबोधन करणे हाही माझा मुख्य उद्देश असल्याचे त्यांनी म्हंटले.