‘तुम्हारा तो सिर्फ वक्त है, हमारा दौर आएगा’ – नितेश राणे

नितेश राणे

टीम महाराष्ट्र देशा : नारायण राणे यांना राज्यसभेची उमेदवारी दिली असतानाच नितेश राणे यांनी ट्विट करून टीकाकारांना जोरदार उत्तर दिल आहे. नितेश राणे याचं एक ट्विट सद्ध्या चर्चेचा विषय बनल आहे.

नारायण राणेंच्या राज्यसभेतील उमेदवारीच्या पार्श्वभूमीवर नितेश राणे यांनी ट्विटरवरुन विरोधकांना प्रत्युत्तर दिले आहे. ‘कुछ ही देर की खामोशी है, फिर कानों मे शोर आएगा, तुम्हारा तो सिर्फ वक्त है, हमारा दौर आएगा’ असे ट्विट त्यांनी केले आहे. हे सूचक ट्विट करत त्यांनी विरोधकांना सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे.

दरम्यान, रविवारी सायंकाळपर्यंत दिल्लीत जाण्यास तयार नसलेल्या नारायण राणेंच भाजपच्या एका बड्या नेत्याने मन वळवल्याने ते राज्यसभेवर जाण्यास तयार झाले, मात्र, नारायण राणेंना राज्यातच मंत्रिपद हवं होत त्यासाठी ते अडून देखील होते. पण भाजपने त्यांना राज्यसभेवर जाण्याचा सल्ला दिल्याने नारायण राणेंकडे पर्यायच उरला नव्हता.

Loading...