नितेश राणेंना जामीन नाहीचं, आणखी १४ दिवसांसाठी न्यायालयीन कोठडीत रवानगी

टीम महाराष्ट्र देशा : उप-अभियंत्याच्या डोक्यावर चिखलाचे पाणी ओतून केलेले आंदोलन नितेश राणे यांना चांगलेच भोवल्याचे दिसत आहे. नितेश राणे यांची आणखी १४ दिवसांसाठी न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.
मुंबई-गोवा महामार्गावरीत खड्ड्यांमुळे नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागत होते. दरम्यान या विरोधात नितेश राणे यांनी उप-अभियंत्याला गडनदी पुलावर बांधून त्यांच्या डोक्यावर चिखलाचे पाणी टाकत आंदोलन केले.

उप-अभियंत्याने या सर्व प्रकारा नंतर पोलिसात धाव घेत नितेश राणे यांच्याविरोधात तक्रार दाखल केली. तक्रार दाखल होताच कणकवली पोलिसांनी नितेश राणे आणि समर्थकांवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली. त्यानंतर नितेश राणे यांना कोर्टासमोर हजर करण्यात आले होते, कोर्टाने नितेश राणे तसेच त्यांच्या समवेत १६ समर्थकांना ९ जुलै पर्यत त्यांना पोलीस कोठडी सुनावली होती.

Loading...

आज ९ जुलैला मुदत संपताच नितेश राणे यांना पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आले. दरम्यान न्यालयाने नितेश राणे यांच्या न्यायालयीन कोठडीत आणखी १४ दिवसांची वाढ केली आहे. विशेष म्हणजे राणेंना आज जामीन मिळेल अशी अपेक्षा राणे समर्थकांना होती, परंतु न्यालयाने जमीन न देता आणखी १४ दिवसांसाठी न्यायालयीन कोठडीत रवानगी केली.

Loading...
Loading...




Loading…




Top Posts

आमची 'आरती ' त्रास देत नाही ; तर तुमच्या ' नमाज ' चा त्रास कसा सहन करणार
अधिवेशन सुरु असतानाच मनसेला मोठा धक्का,'या' बड्या नेत्याने केला राष्ट्रवादीत प्रवेश
जावयाला अडचण झाली तर मुलीलाही अडचण होणार हे लक्षात असुद्या - शिवेंद्रराजे भोसले
राज ठाकरे बाळासाहेबांचे स्वप्न पूर्ण करायला मैदानात उतरत असतील तर त्यांचे स्वागतचं...
...अखेर प्राजक्त तनपुरेंचा राजीनामा
मंत्री अशोक चव्हाण यांचा खरा चेहरा उघड; रयत क्रांतीकडून टीका
'देवेंद्र फडणवीस जगातील सर्वांत खोटारडे नेते'
मनसेच्या झेंड्यावरून वाद,मराठा क्रांती मोर्चा करणार खटला दाखल
रोहितदादा पवार मानले राव या माणसाला ! मुंबईच्या डबेवाल्यांच्या अडचणी जाणून घेण्यासाठी झाला ' एक दिवसाचा मुंबईचा डबेवाला '
बीड: भाजप-राष्ट्रवादीत राडा; सरपंचाला चोपले