‘धन्यवाद अजित पवार! शेवटी अनुभवाचं महत्व तुम्ही दाखवून दिलं; बाकीचे फेसबुक लाईव्हमध्ये व्यस्त’

टीम महाराष्ट्र देशा – देशभरात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉक डाऊन जाहीर करण्यात आलं आहे. सामान्य नागरिक ,कष्टकरी , गरीब, व्यापारी उद्योजक सर्वांनाच याचा फटका बसत आहे. आता राज्य सरकारलाही याचा फटका बसू लागला आहे. कर रुपी उत्पन्नाचा स्रोतच आटल्याने राज्य सरकारला कर्मचारी आणि आमदारांच्या वेतनात कपात करावी लागली .

यावरून वादंग उठलं होतं विरोधी पक्षाने पोलीस आणि आरोग्य सेवा देणाऱ्यांचे वेतन कापू नये असा आग्रह धरला. यानंतर अर्थमंत्री अजित पवार यांनी पगाराचे टप्पे केले जाणार असून पगार कपात केलेली नाही असे स्पष्टीकरण दिले आहे.

आता भाजपचे आमदार यांनी अजित पवार याचं कौतुक करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर नाव न घेता निशाणा साधला आहे. ते ट्वीटर वर म्हणाले, ‘धन्यवाद अजित पवार साहेब. आरोग्य आणि पोलीस सेवा देणार्यांचे वेतन न कापण्याचा निर्णय घेतल्याबद्दल आभार. अनुभव कायम कामी येतो आणि ते तुम्ही दाखवून दिलं आहे. दरम्यान बाकीचे फक्त फेसबुक लाईव्ह करण्यात व्यस्त आहेत.’ अशी टीकाही त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर केली आहे.

हेही पहा –