fbpx

नितेश राणेंना दिलासा, चिखलफेक प्रकरणी सशर्त जामीन मंजूर

टीम महाराष्ट्र देशा : जिल्हा सत्र न्यायालयाने आमदार नितेश राणेंसह १६ जणांना उपअभियंता प्रकाश शेडेकर यांच्यावर चिखल फेक प्रकरणी सशर्त जामीन मंजूर केला आहे.

मुंबई-गोवा महामार्गावरीत खड्ड्यांमुळे नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागत होते. दरम्यान या विरोधात नितेश राणे यांनी उप-अभियंत्याला गडनदी पुलावर बांधून त्यांच्या डोक्यावर चिखलाचे पाणी टाकत आंदोलन केले.

उप-अभियंत्याने या सर्व प्रकारानंतर पोलिसात धाव घेत नितेश राणे यांच्याविरोधात तक्रार दाखल केली. तक्रार दाखल होताच कणकवली पोलिसांनी नितेश राणे आणि समर्थकांवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली. त्यानंतर नितेश राणे यांना कोर्टासमोर हजर करण्यात आले होते, कोर्टाने नितेश राणे तसेच त्यांच्या समवेत १६ समर्थकांना ९ जुलै पर्यत त्यांना पोलीस कोठडी सुनावली होती.

आज ९ जुलैला मुदत संपताच नितेश राणे यांना पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आले. दरम्यान न्यालयाने नितेश राणे यांच्या न्यायालयीन कोठडीत आणखी १४ दिवसांची वाढ केली आहे. विशेष म्हणजे राणेंना ९ जुलै रोजी जामीन मिळेल अशी अपेक्षा राणे समर्थकांना होती, परंतु न्यालयाने जमीन न देता आणखी १४ दिवसांसाठी न्यायालयीन कोठडीत रवानगी केली.

दरम्यान राणे यांना जिल्हा सत्र न्यायालयाने मोठा दिलासा दिला. राणे आणि त्यांच्या सोबत असलेल्या १९ जणांना सशर्त जामीन मंजूर केला. इतकेच नव्हे तर नितेश राणे आणि १९ समर्थकांना दर रविवारी पोलीस स्थानकात हजेरी लावावी लागणार आहे.