fbpx

आता रस्त्यावर दंडुका घेऊनच उभा राहतो – नितेश राणे आक्रमक

टीम महाराष्ट्र देशा : मुंबई-गोवा महामार्गाच्या दुरूस्तीचे काम पाहण्यासाठी आता मी रस्त्यावर दंडुका घेऊनच उभा राहतो, बघतो सरकार काय करतंय मला, असे वक्तव्य आमदार नितेश राणे यांनी केले आहे.

मुंबई-गोवा महामार्गावरीत खड्ड्यांमुळे नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागत होते. दरम्यान या विरोधात नितेश राणे यांनी उप-अभियंत्याला गडनदी पुलावर बांधून त्यांच्या डोक्यावर चिखलाचे पाणी टाकत आंदोलन केले. या आंदोलनानंतर नितेश राणे यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी नितेश राणे यांचे आक्रमक रूप पाहायला मिळाले.

मुंबई-गोवा महामार्गाच्या दुरूस्तीचे काम पाहण्यासाठी आता मी रस्त्यावर दंडुका घेऊनच उभा राहतो, बघतो सरकार काय करतंय मला, असे राणे यांनी म्हंटले. इतकेच नव्हे तर दररोज सकाळी ७ वाजता मी पोहचेल. मला बघायचे आहे सरकार आमच्या विरूद्ध जिंकूच कसे शकते, असेही राणे यांनी म्हंटले.

याचबरोबर सरकारच्या मुजोर पणाला कसा लगाम घालयचा हेही आम्हाला चांगलेच माहित आहे. असेही राणे यांनी म्हंटले. विशेष म्हणजे उप-अभियंत्यावर चिखल फेकल्या प्रकरणी नितेश राणे यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.