आमदार निलेश लंके यांच्या मध्यस्थीनंतर पारनेर संघर्ष समितीचे उपोषण मागे

blank

टीम महाराष्ट्र देशा –  पारनेर न्यायालयची नवी इमारत, पारनेर सुपा रोडवरील गट नंबर ९६ मध्ये प्रस्तावित आहे. तसेच न्यायालयाची इमारत उभारणीसाठी जागाही  पण ताब्यात घेण्यात आलेली आहे. परंतु सदर जागा शहरापासून एक ते दीड किमी अंतरावर असून सर्वसामान्य नागरिकांच्या गैरसोयीची असल्याच म्हणून पारनेर संघर्ष समितीच्या वतीने सुभाष कापरे यांनी आठ दिवसापासून पारनेर पोलीस ठाण्यासमोर उपोषण सुरू केले. पारनेर न्यायालयाची इमारत आहे, त्या जागी उभारावी व तिचे स्थलांतर पारनेर सुपा रोडवरील गट नंबर मध्ये ९६ मध्ये स्थलांतरित करू नये, या प्रमुख मागणीसाठी हे उपोषण सुरु होते.

तसेच पारनेर न्यायालयाच्या इमारतीच्या परिसरात पारनेर तहसील कार्यालय, पारनेर पोलीस स्टेशन, भूमिअभिलेख कार्यालय यांच्यासह इतर कार्यालय मोठ्या प्रमाणावर असून सर्व अधिकारी कर्मचारी व सर्वसामान्यांच्या दृष्टीने सोयीचे आहे. त्यामुळे पारनेर सुपा रोडवरील गट नंबर ९६ मध्ये न्यायालयाची नवीन इमारत झाल्यास ते सर्वांच्या दृष्टीचे गैरसोयीचे होती होईल असही पारनेर संघर्ष समितीचं म्हणण आहे.

आता पारनेरचे आमदार निलेश लंके यांनी यात मध्यस्थी केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आमदार निलेश लंके यांनी सोमवार सायंकाळी या संदर्भात मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्याशी बोलणे झाले असून आगामी कॅबिनेत मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये हा विषय घेऊन आहे त्या जागेवर ही इमारत उभारण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिल्यानंतर कापरे यांनी आपले उपोषण मागे घेतले आहे.

हेही पहा –