fbpx

पावसामुळे तुंबलेल्या पाण्याच्या निचऱ्यासाठी धावले आमदार नरेंद्र पवार

मुंबई- कल्याण पश्चिममध्ये दिवसभर झालेल्या मुसळधार पावसामुळे खोल भागात काही ठिकाणी पाणी साठले होते. काही गोदरेज हिल येथे काही नागरिकांच्या घरामध्ये पाणी शिरल्याचे आमदार नरेंद्र पवार यांना कळले त्यांनी तातडीने धाव घेत मिडटाऊन एंपायर ते सिझन्स अॅव्हेन्यु सोसायटी पर्यंत स्वतः पाहणी करत महापालिकेच्या कर्मचारी व अधिकाऱ्यांना कळवून जेसिबीने पाण्याला वाट करून दिली.

कल्याणमध्ये मुसळधार पावसामुळे नाले भरून जवळपासच्या घरामध्ये पाणी घुसण्यास सुरुवात होत असताना आमदार नरेंद्र पवार यांनी धाव घेत पाण्याला वाट करून देत परिस्थिती आटोक्यात आणली.

यावेळी भाजपा कल्याण शहर उपाध्यक्ष दिपेश ढोणे, माजी नगरसेवक उल्हास भोईर, सुनिल घेगडे, महेश पवार, विकास वर्मा, बी वॉर्ड स्वच्छता अधिकारी गोपाळ राजहंस आदी पदाधिकारीपद, कर्मचारी उपस्थित होते.

मुसळधार पावसाने शहराला झोडपले

राष्ट्रवादीचा आणखी एक आमदार भाजपच्या वाटेवर ?