न्यायालयीन लढाईत बागल पराभूत,आ.पाटील यांची निवड योग्यच;उच्च न्यायालयाचा महत्वपूर्ण निकाल

करमाळा- राष्ट्रवादीच्या नेत्या रश्मी बागल यांना धक्का बसला असून २०१४ विधानसभा निवडणूकीत शिवसेनेचे आमदार नारायण पाटील यांची निवड झाली होती त्या विरोधात दाखल झालेल्या याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली आहे. आमदार  नारायण पाटील यांची निवड योग्य असल्याचा निकाल न्यायमुर्ती के.आर श्रीराम यांनी दिलेला आहे.

२०१४ साली करमाळा विधानसभा निवडणूकीत शिवसेनेचे आमदार नारायण पाटील २५७ मतांनी निवडून आलेले होते. त्यावेळी राष्ट्रवादीचे पराभूत उमेदवार रश्मी बागल यांनी पोस्टल मतांची फेरमतमोजणी व्हावी तसेच नारायण पाटील यांच्या निवडी विरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल केलेली होती.

दाखल केलेल्या याचिकेत रश्मी बागल यांनी आमदार नारायण पाटील तसेच निवडणूक अधिकारी राज्याचे निवडणूक आयुक्त आणि इतर पराभूत उमेदवार यांना प्रतिवादी केले होते.

उच्च न्यायालयाने दोन्ही बाजू ऐकून घेऊन नारायण पाटील यांची योग्य निवड असल्याचा निकाल दिला आहे. त्यामुळे न्यायालयीन लढाईत बागल पराभूत झाला असल्यामुळे रश्मी बागल यांना धक्का बसलेला आहे. करमाळा विधानसभा निवडणूक अधिकारी अविनाश हदगल यांनी आमदार नारायण पाटील विजयी झाल्याचे घोषित केलेले होते.

करमाळा विधानसभा २०१४ उमेदवारनिहाय पडलेली मते-

Loading...

नारायण पाटील(शिवसेना)-६० हजार ६७४,
रश्मी बागल(राष्ट्रवादी काँग्रेस)-६० हजार ४१७,
संजय शिंदे(स्वाभिमानी शेतकरी संघटना)-५८ हजार ३७७,
जयवंतराव जगताप(काँग्रेस आय)-१४ हजार ३४८,
जालिंदर जाधव(मनसे)-१ हजार १४६,
रोहीदास कांबळे(बसपा)-१ हजार १३१,
संतोष साळूंखे(हिंदुस्थान प्रजापक्ष)-४०७,
हनुमंत भिसे(बहुजन मुक्ती पार्टी)-१ हजार १४२,
परमेश्वर तळेकर(अपक्ष)-६७३,
संजय महादेव शिंदे(अपक्ष)-२ हजार,
संजय नामदेव शिंदे(अपक्ष)-५५२,
संजय लिंबराज शिंदे(अपक्ष)-२६२,
राहूल देशमुख(अपक्ष)-२४४,
नोटा-७३६
अंतिम निकाल-नारायण पाटील(शिवसेना) २५७ मतांनी विजयी

२०१९ ला बबनराव शिंदेंना आराम करण्याचा शरद पवार यांचा सल्ला वजा आदेश

Loading...

मकाई सहकारी साखर कारखान्यावर जप्तीचा आदेश

Loading...

माढा नव्हे करमाळ्यातूनचंं आमदारकी लढवणार : संजय शिंदे

3 Comments

Click here to post a comment