बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी आमदार नमिता मुंदडा यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र, पंचनामे करण्याची मागणी

Namita Mundada

बीड : जिल्ह्यामधील काही भागात ढगफुटी सारखा पाऊस पडला असून त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या शेतकऱ्यांचे तत्काळ पंचनामे करुन आर्थिक मदत करण्याची मागणी आमदार नमिता मुंदडा यांनी केली आहे. या संदर्भात आमदार मुंदडा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवले आहे.

या पत्रामध्ये आमदार नमिता मुंदडा यांनी जिल्ह्यातील पावासाच्या परिस्थितीचा उल्लेख केला आहे. त्या म्हणाल्या की, ‘बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई तालुक्यातील हिवरा, सोमनाथ बोरगाव, माकेगाव, कोळकानडी या गावात व परिसरात दिनांक १७ जुलै रोजी ढगफुटी सारखा पाऊस पडला असून त्यामुळे शेतकऱ्यांच्या जमिनीतील माती वाहून गेली आहे. नुकतेच उगवलेले सोयाबीन, उडीद, मूग, मका, तीळ, तुर व उसाच्या पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. पावसाच्या तसेच नदीच्या पाण्यामुळे शेतरस्ते वाहून गेले आहेत. ओढ्याला नदीचे स्वरूप प्राप्त झाले आहे. यापूर्वीही सदर परिसरात अशाच पद्धतीचा पाऊस झाल्यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले होते. कोरोनाच्या संकटात या नैसर्गिक संकटामुळे सदर परिसरातील शेतकरी हवालदिल झाला आहे. त्यामुळे सदर गावांच्या पिकांचे तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना त्वरित आर्थिक मदत देणे आवश्यक आहे.’

या संबंधीत शेतकऱ्यांना त्वरित आर्थिक मदत देण्याची मागणी आमदार मुंदडा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. तसे पत्र त्यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवले आहे. या पत्रात सरकारी यंत्रणेला पंचनामे करण्याचे आदेश देण्यात यावे अशी मागणी करण्यात आली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

IMP