सलाम तुमच्या निष्ठेला ! आठ महिन्याच्या गर्भवती असूनही सामन्यांच्या प्रश्नांसाठी विधानसभेत

टीम महाराष्ट्र देशा :विधिमंडळाचं अधिवेशनाच्या काळात अनेक विषय, चर्चा आणि आंदोलनाची चर्चा होतच असते. अनेक आमदार वेगवेगळ्या विषयावरून चर्चेत असतात. पण आठ महिन्याच्या गर्भवती असतानाही सभागृहात येऊन ही कामकाजात सहभागी होणाऱ्या नमिता मुंदडा यावेळी चर्चेचा विषय झाल्या आहेत.

विशेष म्हणजे गरोदर असताना कामकाजात सहभागी होणाऱ्या त्या पहिल्याच महिला आमदार आहेत. लवकरच प्रसूती असल्यामुळे आणि त्या आधीचं हे महत्वाचं अधिवेशन असल्यामुळे या अवस्थेत ही सभागृहात कामकाजात सहभागी होत असल्यानं त्यांचं कौतुक देखील होत आहे.

Loading...

नमिता मुंदडा, अधिवेशनात केवळ उपस्थिती दर्शवत नाहीत तर आपल्या मतदारसंघातील विविध प्रश्न उपस्थित करताना दिसत आहेत. अधिवेशनात त्यांना सतत बसताना त्रास होतो. त्यामुळं थोड्या वेळ बाहेर लॉबीमध्ये येऊन चालतात. अधिवेशनामुळे जेवण्याच्या अनियमित वेळा असल्या तरी नमिता मुंदडा काम करत आहेत.

माद्यामांशी बोलताना नमिता मुंदडा म्हणाल्या की, निवडणुकीच्या काळात प्रचारात पहिले तीन महिने त्रास झाला. लवकरच प्रसूती आहे आणि त्या आधीचं हे महत्वाचं अधिवेशन असल्यामुळे उपस्थित होणं आवश्यक आहे. इथं सभागृहात अनेक आमदार काळजी घेतात. सरकारच्या धोरणांच्या विरोधात आंदोलन करत असताना त्यामध्ये सहभागी होऊ देत नाहीत, असं त्या म्हणाल्या.

पुढे त्या म्हणाल्या की, सभागृहात महिला अत्याचार सारखे प्रश्न आले की त्रास होतो आणि मनावर काहीसा परिणाम देखील होतो. आपल्या बाळावर वेगळे गर्भसंस्कार होत आहेत असं हसत नमिता मुंदडा यांनी सांगितलं.

तसेच मतदारसंघातील जनता देखील सांगते ताई आता आराम करा, काम करू नका. पण पुढील अधिवेशन येता येणार नाही म्हणूज हे अधिवेशन पूर्ण उपस्थित राहायचं. काम करायचं हा निर्धार त्यांनी केला आहे अस त्यांनी सांगितलं.

नमिता मुंदडा यांनी सभागृहात उशी मिळावी म्हणून अध्यक्षांकडून परवानगी घेतली. तसंच सभागृहात पाणी पिता येत नाही त्यामुळं त्या बाहेर येऊन पाणी पितात. त्यामुळे या स्थितीत देखील त्यांच्या उपस्थित राहण्याचे कौतुक होत आहे.

गेल्यावर्षी विधानसभा निवडणुकीवेळी राष्ट्रवादीकडून उमेदवारी जाहीर झालेली असताना नमिता मुंदडा यांनी भाजपमध्ये ऐनवेळी प्रवेश केला होता. त्या केज मतदारसंघातून मोठ्या मताधिक्याने निवडून देखील आल्या. राष्ट्रवादीतील अंतर्गत गटबाजीमुळे भाजपत प्रवेश केला असल्याचं त्यांनी सांगितलं होतं.

हेही पहा

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

कनिका कपूरच्या तब्ब्येतीबाबत डॉक्टरांनी केला वेगळाच दावा
सावधान ! कोरोनाचे नवे केंद्र झोपडपट्टीत, अनेकजण सापडले कोरोनाबाधित
...त्यामुळे भारताला कोरोनापासून अमेरिके इतका धोका नाही, या तज्ञ डॉक्टरांनी व्यक्त केले मत
‘या’ तारखेपासून रेल्वे तिकीट बुकिंगला होणार सुरुवात?
'नवे रुग्ण न आढळल्यास 'हे' राज्य '७ एप्रिल'पर्यंत कोरोनामुक्त होण्याची शक्यता'
महाराष्ट्रातील ‘या’ शहरात वाढला कोरोनाग्रस्तांचा झपाट्याने आकडा, सात महिन्यांच्या बाळाचाही समावेश
'धन्यवाद अजित पवार! शेवटी अनुभवाचं महत्व तुम्ही दाखवून दिलं; बाकीचे फेसबुक लाईव्हमध्ये व्यस्त'
आज सांयकाळी आणि उद्या सकाळी दुध मिळणार नाही कारण.....
#मरकज : मशीद खाली करण्यास मौलानांनी दिला नकार,  अजित डोवालांना उतरावं लागल मैदानात
काय फरक पडतो म्हणणाऱ्या राज ठाकरेंनाच बसला कोरोनाचा फटका