fbpx

मंत्रीपदाचा राजीनामा दिलेल्या अपक्ष आमदाराने केला भाजपमध्ये प्रवेश

टीम महाराष्ट्र देशा : कर्नाटकातले जेडीयु–कॉंग्रेसचे सरकार धोक्यात आले असून कुमारस्वामी सरकार अल्पमतात गेल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. आधी १३ आमदारांनी, नंतर सरकारमधील एका अपक्ष मंत्र्याने राजीनामा दिल्यानंतर आता कुमारस्वामी सरकारमधील सर्व मंत्र्यांनी राजीनामा दिला आहे. त्यामुळे कुमारस्वामी सरकार संकटात सापडले आहे.

दरम्यान,आमदार राजीनामा मागे घेण्यास तयार नाहीत त्यामुळे कर्नाटक सरकार अडचणीत आलं आहे. या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर भाजपा नेत्या शोभा करंदलाजे यांनी माजी मुख्यमंत्री आणि भाजपाचे नेते बी. एस. येडियुरप्पा यांची भेट घेतली. या भेटीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी कुमारस्वामींच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. आम्ही एकाही बंडखोर आमदाराच्या संपर्कात नाही मात्र दरम्यान अपक्ष आमदार नागेश यांनी भाजपात प्रवेश केल्याचीही माहिती करंदलाजे यांनी दिली आहे.

दरम्यान,या १४ आमदारांचे राजीनामे मंजूर झाल्यास २२४ सदस्य संख्या असलेल्या कर्नाटक विधानसभेची संख्या २१० होईल. त्यामुळे बहुमतासाठी ११३ ऐवजी १०६ सदस्य संख्या लागेल. १४ आमदारांचा राजीनामा मंजूर झाल्यावर कुमारस्वामी सरकारच्या आमदारांची संख्या केवळ १०४ होईल. त्यामुळे कुमारस्वामी सरकारला बहुमतासाठी दोन जागांची अवश्यकता निर्माण होईल, असं सूत्रांनी सांगितलं.